
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट तात्पुरतं निलंबित केलं गेलं. त्यानंतर आता काँग्रेस पक्षातल्या काही बड्या वरिष्ठ नेत्यांचेही अकाऊंट निलंबित करण्यात आले आहे. काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांच्यासह काँग्रेसच्या इतर पाच वरिष्ठ नेत्यांचे अकाऊंटही निलंबित केले आहेकाँग्रेसकडून ही माहिती देण्यात आली आहे. अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस आणि माजी केंद्रीय मंत्री अजय माकन, लोकसभेत असलेले पक्षाचे मनिकम टागोर, आसामचे प्रभारी आणि माजी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाउंट निलंबित करण्यात आलं आहे.
काँग्रेसचे सचिव प्रणव झा यांनी ट्विट केलं की, राहुल गांधी यांच्यानंतर आता राजा नरेंद्र मोदीजी आणि जागीरदार जॅक ( ट्विटरचे सीईओ जॅक डोरसे) यांनी रणदीप सुरजेवाला, अजय माकन आणि सुष्मिता देव यांचं ट्विटर अकाऊंट लॉक केलं आहे. यावर काँग्रेसपक्ष विरोध दर्शवते आणि अन्यायांविरुद्ध लढण्याचं आम्ही वचन देतो.
The list goes on@Twitter locks @JitendraSAlwar and @manickamtagore and many more.
Doesn't Modi Ji understand that we @INCindia'ns have a legacy of fighting even from behind the locks of kaala paani?
He thinks the virtual locks of twitter will deter us from fighting for India??
— pranav jha (@pranavINC) August 11, 2021
एका तासाभरात त्यांनी आणखी एक ट्विट केलं. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिलं की, यादीत आणखीन सुद्धा आहे. ट्विटरनं जितेंद्र सिंह अलवर आणि मणिकम टागोर आणि काही अन्य नेत्यांचे अकाऊंट लॉक केलेत.




