राजकारण

राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात उच्चपदस्थ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचं सत्र सुरुच आहे. आज पुन्हा एकदा महत्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात मंत्रालयातील बड्या अधिकाऱ्यांसह काही जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्यांचाही समावेश आहे. राज्य सरकारने आज २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यात ओ. पी. गुप्ता, रुबल अग्रवाल, दीपककुमार मीना, राहुल रेखावार, दौलत देसाई अशा अनेक अधिकाऱ्यांचा समावेश आहे. बदल्या करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची यादी –

१ .ओ. पी. गुप्ता (१९९२ च्या बॅचचे आएएस अधिकारी) यांची उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता वित्त विभागात प्रधान सचिव म्हणून बदली करण्यात आली आहे.

२. विकास चंद्र रस्तोगी (१९९५ च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावरुन आता उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मंत्रालय, प्रधान सचिव पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

५. इंद्रा मल्लो (१९९ च्या बॅचच्या आएएस अधिकारी) यांची एकात्मिक बालविकास योजना, नवी मुंबईचे आयुक्त पदावरुन सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथं प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

४. अजित पाटील (२००७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी) यांची सामान्य प्रशासन विभाग, मंत्रालय, मुंबई इथून सहसचिव पदावरुन मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई इथं नियुक्ती करण्यात आली आहे.

५. रुबल अग्रवाल (२००८ च्या बॅचच्या आयएएस अधिकारी) यांची पुणे महापालिकेच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त पदावरुन आता आयसीडीसी नवी मुंबई म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

६. दौलत देसाई (आयएएस २००८ बॅच) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांची बदली वैद्यकीय शिक्षण आणि औषध विभागाच्या संयुक्त सचिवपदी मुंबईत झाली.

७. रुचेश जयवंशी (आयएएस: एमएच: २००९) जिल्हाधिकारी, हिंगोली यांची बदली महिला व बाल विभाग, पुणे येथे आयुक्तपदी करण्यात आली.

८. संजय यादव (आयएएस: एमएच: २००९) यांची बदली एमएसआरडीसी, मुंबई येथे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक म्हणून झालीय.

९. शैलेश नवाल (आयएएस: एमएच: २०१०), जिल्हाधिकारी, अमरावती यांना मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या उपसचिवपदी नियुक्त करण्यात आलंय.

१०. आर. एच. ठाकरे (आयएएस: एमएच: २०१०) यांना नागपूरच्या अतिरिक्त आदिवासी आयुक्तपदी नियुक्त करण्यात आलंय.

११. जे. एस. पापळकर (आयएएस: एमएच: २०१०) अकोला जिल्हाधिकारी यांची अकोला महापालिका आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

१२. जी. एम. बोडके (आयएएस: एमएच: २०१०)यांची महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या सह व्यवस्थापकीय संचालकपदावरून हिंगोलीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

१३. राहुल अशोक रेखावार (आयएएस: एमएच: २०११) यांची अकोल्याचे एमएस अ‍ॅसिड कॉर्पोरेशन व्यवस्थापकीय संचालकपदावरून कोल्हापूरचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलीय

१४. रवींद्र बिनवडे (आयएएस: एमएच: २०१२) यांची जालनाच्या जिल्हाधिकारी पदावरून थेट पुणे महापालिका आयुक्त म्हणून बदली करण्यात आलीय

१५. दीपककुमार मीना (आयएएस: एमएच: २०१३) यांची नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आलीय.

१६. पवनीत कौर यांची अमरावतीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. याआधी त्यांच्याकडे पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदाचा कार्यभार होता.

१७. विजय चंद्रकांत राठोड यांना जालन्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

१८. निमा अरोरा यांची अकोल्याच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

१९. आंचल गोयल यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

२०. डॉ. बी.एन.पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button