Top Newsस्पोर्ट्स

टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी आजचा दिवस सुवर्णमय; दोन सुवर्णपदकांसह पाच पदके

टोक्यो : टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी यंदा ऑलिम्पिक खेळांमध्ये अप्रतिम कामगिरी केली. आता अशीच कामगिरी भारताचे पॅरा अ‍ॅथलिट्स टोक्यो पॅरालिम्पिकमध्ये करत आहेत. आज दिवसभरात भारतीय खेळाडूंनी पाच पदकं खिशात घातली आहेत. यामधील सर्वात पहिलं पदक तेही सुवर्णपदक अवनी लेखरा हिने निशानेबाजीत मिळवलं. महिलांच्या आर-२ १० मीटर एअर रायफल के क्लास एसएच१ मध्ये सुवर्णपदक मिळवत अवनीने इतिहास रचला.

भारतीय भालाफेकपटू सुमित अंतिलने सोमवारी टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. पहिल्यांदा पॅरालिम्पिकमध्ये खेळताना सुमितने भाला फेकण्याच्या एफ६४ स्पर्धेच्या दुसऱ्या प्रयत्नात ६८.०८ मीटरचा थ्रो केला. त्यानंतर त्याने आपल्या पाचव्या प्रयत्नात त्यात आणखी सुधारणा केली आणि ६८.५५ मीटर भाला फेकून विश्वविक्रम केला.

सुमितने पहिल्याच प्रयत्नात ६६.९५ मीटर अंतरावरून भाला फेकला, जो देखील एक विक्रम आहे. त्याने दुसऱ्या प्रयत्नात ६८.०८ मीटर भाला फेकला. त्यानंतर तिसऱ्या प्रयत्नात त्याने ६५.२७ मीटर, चौथ्या प्रयत्नात ६६.७१ मीटर आणि पाचव्या प्रयत्नात सुमितने ६८.५५ मीटर भाला फेकला.

टोकियो पॅराॉलिम्पिकमध्ये भारताचे आतापर्यंतचे हे दुसरे सुवर्णपदक आहे. याआधी महिला नेमबाज अवनी लखेरा हिने सोमवारी सकाळी सुवर्णपदक पटकावले. भारताने आतापर्यंत ७ पदके जिंकली आहेत, यामध्ये २ सुवर्णपदके आहेत.

भारताने मिळवलेलं दिवसभरातील दुसरं रौप्य पदक योगेश कथुनियाने पुरुषांच्या थाळीफेक स्पर्धेत मिळवून दिलं. योगेशने एफ५६ प्रकारात ४४.३८ मीटर दूर थाळी फेकत रौप्य पदक पटकावलं

भारतीय खेळाडूंनी दोन सुवर्ण आणि दोन रौैप्य पदकांसह एक कांस्य पदकही मिळवलं. हे पदकंही भालाफेकमध्येच मिळवलं असून सुंदर सिंह गुजर्रने ६४.०१ मीटर लांब थ्रो करत कांस्यपदक पटकावलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button