Top Newsराजकारण

क्रुझवर छाप्यावेळी समीर वानखेडेंसोबत होता किरण गोसावी; फोटोतून खुलासा

मुंबई : आर्यन खान निगडीत ड्रग्ज प्रकरणात तपास करणाऱ्या एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. बॉलिवूड कलाकारांमध्ये दहशत पसरवून त्यांच्याकडून कोट्यवधी वसूल केले जातात असा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणातील साक्षीदार पलटल्याने समीर वानखेडे चांगलेच अडचणीत आले आहेत. आर्यनला सोडण्यासाठी २५ कोटींची डील होणार होती. त्यातील ८ कोटी वानखेडेंना मिळणार असल्याचा गंभीर आरोप पंच साक्षीदार प्रभाकर साईलनं केला आहे.

एनसीबीनं या प्रकरणात फरार आरोपी किरण गोसावी याला स्वतंत्र साक्षीदार बनवल्यानं वाद निर्माण झाला. किरण गोसावी सध्या फरार असून त्याला मुंबईत येण्याची भीती वाटतेय. यूपीत सरेंडर करणार असल्याचं म्हटलं. सूत्रांच्या माहितीनुसार किरण गोसावी महाराष्ट्राच्या सीमेत दाखल झाला आहे. मडियावा पोलीस ठाण्याबाहेर बंदोबस्त आहे परंतु आतापर्यंत गोसावीने सरेंडर केले नाही.

एनसीबी तपासातील फरार पंच किरण गोसावी आणि समीर वानखेडे यांचे काही फोटो समोर आले आहेत. यात फोटोत काही लोकांमध्ये समीर वानखेडे खुर्चीत बसलेले दिसतात. तर त्यांच्यामागे किरण गोसावी आणि मनीष दिसून येतो. हा फोटो क्रुझवरील आहे. म्हणजे एनसीबीने छापा टाकला होता तेव्हा ते दोघंही तिथे हजर होते. किरण आणि प्रभाकर यांच्यातील व्हॉट्स अ‍ॅप चॅटदेखील समोर आलं आहे जे ३ ऑक्टोबरचं आहे. त्यात किरण गोसावीनं साईलला सूचना केल्या होत्या. बाहेरुन दरवाजा लाव आणि चावी खिडकीच्या बाहेर फेकून दे असं गोसावीने सांगितले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button