आरोग्य

विरारच्या रुग्णालयातील दुर्घटनेबद्दल पंतप्रधान, राज्यपाल, मुख्यमंत्र्यांना दु:ख

नवी दिल्ली/मुंबई : विरारमधील रुग्णालयात लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानीबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्यपाल भागात सिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी अनेक नेत्यांनी मोदींकडून दु:ख व्यक्त केले आहे. विरार येथे एका रुग्णालयाला लागलेल्या आग प्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दखल घेतली. यासह मृतांच्या नातेवाईकांना २ लाख तर जखमीना ५० हजारांची मदत जाहीर केली आहे.

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीच्या दुर्घटनेत झालेल्या करोना रुग्णांच्या मृत्युबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. विरार येथील एका खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात आग लागून काही कोरोना रुग्णांचा मृत्यु झाल्याचे वृत्त समजून व्यथित झालो. सर्व मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना आपल्या तीव्र शोकसंवेदना कळवतो व जखमी रुग्णांना उत्तम आरोग्य लाभावे यासाठी प्रार्थना करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.

मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

विरार येथील विजय वल्लभ रुग्णालयातील आगीत मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख आणि गंभीर जखमी रुग्णांना प्रत्येकी १ लाख रुपये मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे

रुग्णालयात लागलेल्या आगीचं कारण स्पष्ट

विरारमधील विजय वल्लभ या खाजगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात लागलेल्या आगीत १३ कोरोनाबाधित रुग्णांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. यात ५ महिला आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. ही घटना पहाटे तीनच्या सुमारास ही घटना घडली. वसई विरार अग्निशमन दलाच्या जवानांनी सकाळी आगीवर नियंत्रण मिळवले आहे. विरार पश्चिम येथील चार मजली विजय वल्लभ या हॉस्पिटलमध्ये ९० रुग्ण उपचार घेत होते. त्यातील १७ कोरोनाबाधित रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत होते.

पहाटे तीनच्या सुमारास रुग्णालयातील दुसऱ्या मजल्यावरील अतिदक्षता विभागातील एसीच्या कॉम्प्रेसरमध्ये स्फोट झाला. त्यानंतर काही मिनिटातच आगीने अतिदक्षता विभागात आगीचे तांडव झाले. आग लागली तेव्हा त्याठिकाणी १७ रुग्ण होते. आग लागल्यावर डॉक्टर आणि कर्मचारी सुखरूप बाहेर पडण्यात यशस्वी झाले. चार रुग्णांना वाचवण्यात यश आले. पण, आगीत १३ रुग्ण दगावले आहेत.

आगीत मृत्यू पावलेल्या रुग्णांची नावे :

1. उमा सुरेश करगुंटकर (६३, महिला)
2. निलेश भोईर (३५, पुरुष)
3. पुखराज वैष्णव (६८, पुरुष)
4. रजनी कडू (६०, महिला)
5. नरेंद्र शंकर शिंदे (५८, पुरुष)
6. कुमार किशोर दोशी (४५, पुरुष)
7.जनार्दन मोरेश्वर म्हात्रे (६३, पुरुष)
8. रमेश उपायन (५५, पुरुष)
9. प्रवीण गौडा (५५, पुरुष)
10. उमेश राजेश राऊत (२३, पुरुष)
11. शमा अरुण म्हात्रे (४८, महिला)
12.सुवर्णा पितळे (६४, महिला)
13. सुप्रिया देशमुख (४३, महिला)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button