‘रिअल एचडी’ अनुभवाविषयी जागरूक करणारी ‘स्टार इंडिया’ची नवीन मोहीम
मुंबई : ‘एचडी टीव्ही’ आणि ‘एचडी सेट टॉप बॉक्स’ (एसटीबी) उपलब्ध असूनही, स्टार वाहिन्या ‘स्टॅंडर्ड डेफिनिशन’ (एसडी) स्वरुपात पाहाव्या लागणाऱ्या टीव्हीच्या प्रेक्षकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी, “सिर्फ दिखाने के लिये नही, देखने में भी रिअल एचडी एक्सपेरियन्स” ही नवीन टीव्ही जाहिरात ‘स्टार इंडिया’ने आपल्या सर्व वाहिन्यांवर प्रसारीत केली आहे.
आपल्याकडे ‘एचडी टीव्ही’ असल्यामुळे आपल्याला संपूर्ण ‘एचडी’ अनुभव मिळतो, असा ग्राहकांचा समज असतो. तो या जाहिरातीमधून थोड्या विनोदी अंगाने खोडून काढण्यात आला आहे. ‘एचडी टीव्ही’ आणि ‘एचडी सेट टॉप बॉक्स’ असूनही खऱ्या अर्थाने संपूर्ण ‘एचडी’ अनुभव घ्यायचा असेल, तर ‘एचडी वाहिन्यां’चे सबस्क्रिप्शन घ्यावे लागते, याची माहिती केवळ 25 टक्केच* ग्राहकांना असते, असा निष्कर्ष ‘स्टार इंडिया’ने केलेल्या एका अभ्यासातून निघाला आहे,
‘स्टार’च्या एचडी वाहिन्यांची वैशिष्ट्ये या जाहिरातीत मांडण्यात आली आहेत. अधिक रुंद चित्र, पाच पट अधिक स्पष्ट चित्र**, 5.1 डॉल्बी सराउंड साऊंड** या वैशिष्ट्यांमुळे दर्शकांना स्टार एचडी वाहिन्यांमध्ये अधिक उत्तम व अधिक जाज्वल्य अनुभव मिळू शकतो, ’ताकी आपका एचडी टीव्ही सिर्फ दिखाने के लिये ही नही, देखने में ङी रिअल एच डी एक्सपेरियन्स दे!’
‘स्टार अॅंड डिस्ने इंडिया’चे भारत व आंतरराष्ट्रीय टीव्ही वितरण विभागाचे प्रेसिडेंट गुरजीत सिंग कपूर म्हणाले, “स्टार इंडियामध्ये आम्ही नेहमीच आमच्या प्रेक्षकांना एक अतुलनीय मनोरंजनाचा अनुभव आणि मूल्य देण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. आमच्या विस्तृत पोर्टफोलिओतील 26 स्टार एचडी वाहिन्यांवर विविध प्रकारचे व वेगवेगळ्या भाषांचे कार्यक्रम सुरू असतात. त्यांतील कार्यक्रमांकडे आता पुढील काही काळात प्रेक्षकांचा ओढा वाढणार आहे. या वर्षी क्रिकेटचे सामने मोठ्या प्रमाणात होणार आहेत, तसेच ‘व्हिवो आयपीएल 2021’ ही स्पर्धा लवकरच सुरू होत आहे. अशा वेळी प्रेक्षकांना अतिशय आनंददायी आणि ‘स्टेडियम’सारखा अनुभव मिळावा अशी आमची इच्छा आहे. हा अनुभव आमच्या एचडी वाहिन्यांमधून मिळतो. ‘स्टार एचडी’ वाहिन्यांचे सबस्क्रिप्शन घेऊन टीव्हीचा उत्तुंग अनुभव घेण्याची ग्राहकांसाठी हीच योग्य वेळ आहे. ग्राहकांना या संदर्भात जागरूक करण्याचे, तसेच स्टार एचडी वाहिन्यांचे रिचार्जिंग करण्यास त्यांना मदत करण्याचे आमच्या जाहिरातीचे उद्दिष्ट आहे.”
ही मोहीम एका चांगल्या-संकल्पित चित्रपटाद्वारे चालविली गेली आहे. घरात चांगल्या वस्तू आणून त्या केवळ शोभेसाठी ठेवण्याची काही लोकांची जन्मजात सवय असते. त्या वस्तू आणण्याचा खरा उद्देश मात्र मागे पडतो. एखाद्या फॅन्सी, फ्लॅट स्क्रीनच्या एचडी टीव्हीमुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा वाढत असली, तरी त्यावर स्टार एचडी वाहिन्या सुरू करून, ‘अपने एचडी टीव्ही का नाम रोशन कीजिये’, असा संदेश या जाहिरातीतून उपहासात्मक पद्धतीने देण्यात आला आहे. टीव्हीची उपयुक्तता अधिक असल्याचे प्रेक्षकांना त्यातून दाखवून दिले जाते. या जाहिरातीमध्ये ‘स्टार इंडिया नेटवर्क’वरील लोकप्रिय अभिनेत्यांचाही सहभाग आहे. त्यांनी त्यामध्ये ‘रिअल एचडी’ अनुभवाचे कौतुक केले आहे.