महिला

स्किल इंडियाकडून भारतभरातील २५ महिला लघु उद्योजकांचा सन्‍मान

नवी दिल्‍ली : आंतराष्‍ट्रीय महिला दिनानिमित्त मिनिस्‍ट्री ऑफ स्किल डेव्‍हलपमेंट अॅण्‍ड आंत्रेप्रीन्‍युअरशीपने (एमएसडीई) राजधानी शहरातील २५ महिला लघु उद्योजकांना सन्‍मानित केले. यामधून कौशल्‍ये व विभागांमध्ये प्रशिक्षण व मार्गदर्शन करत महिलांना सक्षम करण्‍याप्रती त्‍यांची कटिबद्धता दिसण्‍यात आली. केंद्रीय कौशल्‍य विकास व उद्योजक मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे यांच्‍या हस्‍ते राजधानी शहरामध्‍ये आयोजित करण्‍यात आलेल्‍या कार्यक्रमामध्‍ये विविध मान्‍यवरांच्‍या उपस्थितीत महिलांना प्रमाणपत्रे प्रदान करण्‍यात आली. याप्रसंगी एमएसडीईचे सचिव प्रवीण कुमार, एसएसडीईचे अतिरिक्‍त सचिव अतुल कुमार तिवारी, एसएमडीईच्‍या अतिरिक्‍त सचिव श्रीमती जुथिका पाटणकर व प्रशिक्षण महानिदेशालयाच्‍या महासंचालक श्रीमती नीलम शमी राव आणि कौशल्‍य इकोप्रणालीमधील विद्यार्थी, विशेषत: प्रशिक्षणासाठी निवडण्‍यात आलेल्‍या महिला उमेदवार उपस्थित होत्या.

या २५ अपवादात्‍मक महिलांचा त्‍यांनी दाखवलेल्‍या हार न मानण्‍याच्‍या उत्‍साहासाठी पुरस्‍कारासह सन्‍मान करण्‍यात आला. त्‍यांनी स्‍वत:साठी उज्‍ज्‍वल भविष्‍य निर्माण करण्‍यासाठी त्‍यांच्‍या जीवनातील संघर्षमय स्थितींवर मात केली आहे. त्‍यांना प्रधानमंत्री कौशल विकास योजना (पीएमकेव्‍हीवाय), इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ आंत्रेप्रीन्‍युअरशीप, नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर आंत्रेप्रीन्‍युअरशीप अॅण्‍ड स्‍मॉल बिझनेस डेव्‍हलपमेंट (एनआयईएसबीयूडी), डायरेक्‍टोरेट ऑफ जनरल ट्रेनिंग (डीजीटी) आणि जन शिक्षण संस्‍थान (जेएसएस) अशा स्किल इंडिया मिशनच्‍या वेगवेगळ्या विभागांकडून प्रशिक्षण मिळाले आहे. पुरस्‍कार-प्राप्‍त महिलांनी एज्‍युटेक, हँडीक्राफ्ट, कूकिंग, पिकल-मेकिंग, कोईर आर्टिसनशीप, हँडीक्राफ्ट, अॅपरल, ब्‍युटी अॅण्‍ड वेलनेस, फ्रण्‍ट ऑफिस मॅनेजमेण्‍ट, कस्‍टमर रिलेशनशीप मॅनेजमेण्‍ट, कॉस्‍मेटॉलॉजी, इलेक्ट्रिशियन, फॅशन डिझाइनिंग, ड्रेस मेकिंग, डिझाइनिंग अॅण्‍ड एम्‍ब्रायोडरी, बेकरी अॅण्‍ड कन्‍फेक्‍शनरी, हेल्‍थकेअर आणि ज्‍यूट वेव्हिंग अशा विविध कार्यक्षेत्रांमध्‍ये त्‍यांची छाप निर्माण केली आहे.

कौशल्‍य विकास व उद्योजकता मंत्री डॉ. महेंद्र नाथ पांडे म्‍हणाले, ”आम्‍हाला आमच्‍या कौशल्‍य इकोप्रणालीमधील महिलांच्‍या जीवनांमध्‍ये आमूलाग्र बदल होताना दिसण्‍यात आला आहे. या महिलांनी त्‍यांच्‍या आवडीच्‍या कौशल्‍यासह स्‍वत:ला सक्षम केले आहे आणि आज इतर अनेकांसाठी आदर्श निर्माण केला आहे. आजचे संमेलन अधिकाधिक महिलांना उद्योजकता स्‍वीकारण्‍यास व आपल्‍या माननीय पंतप्रधानांच्‍या ‘आत्‍मनिर्भर भारत’ दृष्टिकोनाप्रती योगदान देण्‍यास प्रोत्‍साहित करण्‍याकरिता आहे. एमएसडीईचा देशातील अधिकाधिक महिला उद्योजकतेला चालना देण्‍याच्‍या आमच्‍या उद्देशाशी संलग्‍न राहत स्‍वत:चे स्‍टार्ट-अप्‍स सुरू करण्‍याची इच्‍छा असलेल्‍या आमच्‍या इकोप्रणालीमधील पात्र व कुशल महिलांना संस्‍थात्‍मक साह्य करण्‍याचा मनसुबा आहे.”

डॉ. पांडे म्‍हणाले, ”आज वेल्डिंग, ऑटोमोबाइल मेकॅनिक्‍स, सीएनसी मशिन ऑपरेटर्स, इलेक्‍ट्रॉनिक, हार्डवेअर इत्‍यादी सारख्‍या उच्‍च कौशल्‍यपूर्ण कामांमध्‍ये, तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्‍स, ३डी प्रिंटींग, डेटा अॅनालिटिक्‍स इत्‍यादी सारख्‍या इंडस्‍ट्री ४.० शी संलग्‍न आधुनिक कामांमध्‍ये महिलांचा सहभाग वाढत आहे. माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्‍या मार्गदर्शनांतर्गत आम्‍ही १०,००० विशेषरित्‍या-सक्षम महिलांना (दिव्‍यांग) त्‍यांच्‍या आवडीची कौशल्‍ये व व्‍यापारांमध्‍ये प्रशिक्षण देण्‍यासाठी महिला व बाल विकास मंत्रालयासोबत सहयोगाने कार्य करत आहोत. या सर्व प्रयत्‍नांमुळे समाजामध्‍ये महिलांना दिल्‍या जाणा-या सन्‍मानामध्‍ये आमूलाग्र बदल घडून आला आहे.”

ते पुढे म्‍हणाले, ”प्रधानमंत्री कौशल्‍य विकास योजना २.० (पीएमकेव्‍हीवाय २.०) अंतर्गत ४५ लाखांहून अधिक महिलांना विविध कौशल्‍ये व व्‍यापारांमध्‍ये, तसेच पारंपारिकरित्‍या पुरूषांचे प्रभुत्‍व असलेल्‍या ऑटोमेशन, रोबोटिक्‍स इत्‍यादी सारख्‍या कामांमध्‍ये प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रेरणादायी चिन्‍ह असून महिला सक्षमीकरणाप्रती आमच्‍या कटिबद्धतेची पुष्‍टी देते.”

एमएसडीईने महिलांना विविध कौशल्‍यांचे प्रशिक्षण देण्‍यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. प्रधानमंत्री कौशल विकास योजनेअंतर्गत प्रशिक्षित एकूण १.२१ कोटी तरूणांमध्‍ये जवळपास ५० टक्‍के महिला उमेदवार आहेत. पीएमकेव्‍हीवाय २.० (२०१६-२०२०) अंतर्गत जानेवारी २०२१ पर्यंत एकूण ४५,७१,६४६ महिलांना प्रशिक्षण देण्‍यात आले आहे. एकूण निवडण्‍यात आलेल्‍या उमेदवारांपैकी ५३ टक्‍के महिला आहेत. देशभरातील आयटीआयमधील महिला उमेदवारांची संख्‍या स्किल इंडिया सुरू झाल्‍यापासून जवळपास दुप्‍पट (९७ टक्‍के) झाली आहे. पीएमकेव्‍हीवायच्‍या रेकग्निशन ऑफ प्रायर लर्निंग (आरपीएल) प्रोग्रामअंतर्गत २१ लाखांहून अधिक महिलांचे मूल्‍यांकन, अपस्किलिंग करण्‍यासोबत त्‍यांना प्रमाणपत्रे देण्‍यात आली आहेत. ज्‍यामुळे त्‍यांना अधिकृत अर्थव्‍यवस्‍थेमध्‍ये सामावून घेत त्‍यांच्‍या विद्यमान कौशल्‍यांमध्‍ये सुधारणा करण्‍यात आली आहे. तसेच देशभरातील २२६ जन शिक्षण संस्‍थानामध्‍ये प्रशिक्षण घेत असलेल्‍या उमेदवारांपैकी ८५ टक्‍क्‍यांहून अधिक महिला उमेदवार आहेत.

स्किल इंडियाने आयुषमान भारत, स्‍वच्‍छ भारत मिशन, स्‍मार्ट सिटी मिशन इत्‍यादी सारख्‍या शासकीय उपक्रमांसोबत सहयोग केला आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून कुशल कर्मचारीवर्गाच्‍या स्थिर प्रवाहाची खात्री घेण्‍याद्वारे या राष्‍ट्रीय मिशन्‍सना कौशल्‍य विकास प्रयत्‍नांशी संलग्‍न केले जात आहे. या उपक्रमांमुळे लाखो रोजगार देखील निर्माण होत आहे. विशेषत: महिलांसाठी केअरगिव्‍हर, आया, परिचारिका, डायबिटीस एज्‍युकेटर्स इत्‍यादी सारखे रोजगार निर्माण होत आहेत.

स्किल इंडियाचे १९ नॅशनल स्किल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट्स आहेत, जे विशेषत: महिलांना कौशल्‍य प्रशिक्षण देत आहेत. हे एनएसटीआय ऑफिस मॅनेजमेण्‍ट, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, फॅशन डिझाइन अॅण्‍ड टेक्‍नोलॉजी, कम्‍प्‍युटर-एडेड एम्‍ब्रायोडरी अॅण्‍ड डिझाइनिंग इत्‍यादी सारख्‍या विविध क्षेत्रांमध्‍ये कौशल्‍य प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन करतात. आमची ६ प्रधानमंत्री महिला कौशल विकास केंद्रे देखील आहेत, ज्‍यामध्‍ये महिला उमेदवारांसाठी प्रवास सुविधा देखील आहे आणि माता असलेल्‍या महिलांना कौशल्‍य प्रशिक्षण घेण्‍यामध्‍ये मदत करण्‍यासाठी क्रेचे सुविधा देखील आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button