स्पोर्ट्स

नेमबाज मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनामुळे निधन; वडिलांचाही सकाळीच मृत्यू

नाशिक : नाशिकमध्ये कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनामुळे मृत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस चिंतेत भर घालत आहे. भारताच्या युवा नेमबाज संघाच्या माजी सहाय्यक प्रशिक्षक आणि श्रीलंका नेमबाज संघाच्या प्रशिक्षक आणि शूटर मोनाली गोऱ्हे यांचे कोरोनामुळे निधन झाले आहे. दुर्दैवाची बाब म्हणजे, सकाळीच त्यांच्या वडिलांचेही कोरोनामुळे निधन झाले.

मोनाली गोऱ्हे यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या घरातील सदस्यांची कोरोनाची चाचणी घेतली होती. त्यांच्या वडिलांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर नाशिक शहरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. पण, आज अचानक त्यांची प्रकृती खालावली आणि त्यांचं निधन झालं. मोनाली यांच्यावर सुद्धा उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान, दुपारी त्यांनीही प्राण सोडले. पित्यापाठोपाठ मोनाली यांचाही मृत्यू झाल्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button