साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर
२ मराठी लेखकांचा सन्मान; नंदा खरे यांनी पुरस्कार नाकारला
नवी दिल्ली : देशभरात प्रतिष्ठेचे मानले जाणारे साहित्य अकादमीचे पुरस्कार जाहीर (Sahitya Akademi Award) झाले आहेत. यात नागपूरचे ‘नंदा खरे’ यांना त्यांच्या ‘उद्या’ या कादंबरीसाठी सन २०२० चा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. तसेच ‘आबाची गोष्ट’ या आबा गोविंदा महाजन यांनाही लघुकथासंग्रहास ‘बालसाहित्य पुरस्कार जाहीर’ झाला आहे. या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रूपये, ताम्रपत्र आणि शाल असे असून यावर्षी विशेष समारंभात पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
साहित्य अकादमीने २० भाषांसाठी वार्षिक साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणा केली. यामध्ये सात कविता, चार उपन्यास, पाच कथा संग्रह, दोन नाटकं, एक-एक संस्मरण आणि महाकाव्यांचा समावेश होता. मराठीसाठी असलेल्या या पुरस्कारांमध्ये सतीश काळसेकर, वसंत आबाजी डहाके, आणि डॉ. निशिकांत मिरजकर यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले होते.
जळगाव जिल्ह्यातील लेखक व कवि प्रामुख्याने बाल साहित्यासाठी ख्याती असलेले आबा गोविंदा महाजन ( aba govinda mahajan ) यांच्या आबाची गोष्ट ( abachi goshta ) बालकथासंग्रहासाठी बालसाहित्यातील साहीत्य अकादमीचा पुरस्कार ( sahitya akademi award ) जाहीर झाला आहे. आबा गोविंदा महाजन महाराष्ट्र सरकारच्या महसूल खात्यात अधिकारी आहेत. सध्या ते शिरपूर येथे तहसीलदार म्हणून कार्यरत आहेत.
आबा महाजन यांची १३ पुस्तके व १० पोस्टर कविता, २ बालकुमार कथा संग्रह, २ बालकुमार कांदबरी प्रकाशित झाल्या आहेत. त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाचे ३ पुरस्कार मिळाले आहेत. आबा महाजन यांचे बालकथा. बालकादंबरी, बालकविता, बालनाट्य व मुलांसाठी ललित लेखन असे बालसाहित्यातल्या सर्व प्रकारांचे लेखन प्रकाशित आहे.
‘उद्या’विषयी…
‘उद्या’ हा मागील तीनशे वर्षांपासूनचा लेखकाच्या मनातील सल आहे. लेखकाने कमालीच्या अस्वस्थतेतून वर्तमानाचा वेध घेत या कादंबरीत भविष्याचा बहुआयामी पट सादर केला आहे. या कादंबरीत सुदीप जोशी, अरुण सन्मार्गी, सच्चिदानंद भाकरे, सानिका धुरू या प्रमुख पात्रांच्या आयुष्यावर सहजगत्या प्रकाश टाकला आहे. सायबर क्राइम आयुक्त झालेला अरुण सन्मार्गी हा अभिव्यक्ती व वर्तन विश्लेषक आहे. सुदीप जोशी हा महिकादळ या मुंबईतील एका प्रमुख पक्षाच्या संघटनेच्या प्रमुख नेत्याचा लेखनिक आहे.अशा प्रकारे कादंबरीतील सर्व पात्रांना या कादंबरीत उत्तमरित्या न्याय देण्यात आला आहे.
पुरस्कार बालमित्रांना समर्पित
आबा महाजन यांनी हा पुरस्कार आपल्या बालमित्रांना तसेच खानदेशातील बोलीला समर्पित केला आहे. गेल्या 30 वर्षांपासून आपल्या बालसाहित्याच्या साधनेची दखल साहित्य अकादमीने घेतली, याचा मनस्वी आनंद असल्याची भावना महाजन यांनी व्यक्त केली. बालसाहित्यात आजवर आपण अनेक प्रयोग केले. ‘आबाची गोष्ट’ या लघुकथा संग्रहात निम्म्याहून अधिक कथा या माझ्या बालपणातील घटनांची निगडीत आहेत. खानदेशातील अनेक संदर्भ या कथांमध्ये असल्याचे आबा महाजन यांनी सांगितले.
नंदा खरे यांनी पुरस्कार नाकारला
उद्या कादंबरीचे लेखक नंदा खरे यांनी मात्र पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार मिळाल्याचा आपल्याला आनंद आहे. पण हा पुरस्कार मी नाकारतो, असं ते म्हणाले. समाजाने आपल्याला आजवर भरपूर दिलं, असं नंदा खरे म्हणाले