राजकारण

पोलीस अधिकारी सचिन वाझे यांची २४ तासात दुसऱ्यांदा बदली

मुंबई : मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Case) अडचणीत सापडलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे प्रमुख सचिन वाझे (Sachin Vaze) यांची नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होता. मात्र, आता पुन्हा त्यांची एसबी-१ म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली आहे.

मुंबईत उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर काही दिवसांपूर्वी स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. या गाडीचा तपास सचिन वाझे यांच्याकडे सोपवण्यात आला होता. यातच काही दिवसांपूर्वी या गाडीचा मालक मनसुख हिरेन यांचा मृत्यू झाला. यानंतर सचिन वाझे हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. याशिवाय, मनसुख हिरेन यांच्या पत्नीने सचिन वाझेंवर खुनाचा आरोप केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.

सचिन वाझेंवर हिरेन यांच्या पत्नीने खुनाचा आरोप केला आहे. तरीही ते या पदावर ठेवले जात असल्यास पुरावे नष्ट केले जाऊ शकतात. सचिन वाझेंना पाठिशी घालण्याचे कारण काय, असा सवाल विरोधकांकडून करण्यात येत होता. अखेर या प्रकरणी ठाकरे सरकारला बॅकफूटवर जावे लागले आणि सचिन वाझे यांची बदली करण्यात येणार असल्याची घोषणा दोन दिवसांपूर्वी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी विधान परिषदेत केली होती. त्यामुळे सचिन वाझे यांची कोणत्या विभागात बदली होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणामुळं चर्चेत आलेल्या सचिन वाझे यांची दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे. मी ती स्कॉर्पिओ वापरली नाही, माझा धनंजय गावडेंना ओळखतही नाही, अशी माहिती सचिन वाझेंनी एटीएसला दिली. महाराष्ट्र एटीएस मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचे नाव चांगलेच चर्चेत आले आहे. यानंतर सचिन वाझेंनी ATS ने दहा तास चौकशी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून वाझेंवर अनेक आरोप होत होते. या आरोपानंतर वाझे स्वत: हून ATS च्या समोर गेले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button