शिक्षण

एम्पॉवर आणि सिम्बॉयसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीईंग यांच्यातर्फे आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रतिसाद

मुंबई: उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य ही समस्या गेल्या वर्षभरात संपूर्ण जगभरात भेडसावत आहे, नैराश्य, चिंता, खाण्याचा अराजक , पदार्थ दुरुपयोग आणि स्वतःला इजा करवून घेणे हे मानसिक आजार सामान्यतः सर्वत्र आढळून आले. आयुष्यात पुढे जाण्याबाबतच्या अति अपेक्षा आणि सोशल मीडिया यामुळे समस्या अधिकच गंभीर होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार किशोरवयीन मुलांमध्ये आजार आणि अकार्यक्षमता निर्माण होण्याला नैराश्य खूप मोठ्या प्रमाणावर कारणीभूत आहे. शारीरिक, भावनिक आणि सामाजिक बदल यांचा एकत्रित प्रभाव, सामाजिक भेदभाव, वाईट वागणूक किंवा हिंसा यामुळे युवा पिढी मानसिक आरोग्य समस्यांना बळी पडत चालली आहे, ही परिस्थिती अक्राळविक्राळ रूप धारण करण्याआधीच त्यावर तोडगा काढला पाहिजे. जर तसे केले नाही तर शारीरिक आणि मानसिक आरोग्य तर धोक्यात येईलच शिवाय अजून काही वर्षांनी, मोठे झाल्यानंतर देखील त्यांना पुढे जाण्याच्या खूपच कमी संधींचा वापर करून घेता येईल. विद्यापीठ, कुटुंब आणि मित्रमंडळींमध्ये सहायक वातावरण निर्माण केल्याने आणि व्यापक समाजाच्या योगदानातून देखील या समस्या दूर होऊ शकतात.

सध्याच्या या समस्यांची गंभीर दखल घेत आदित्य बिर्ला एज्युकेशन ट्रस्टतर्फे भारतातील मानसिक आरोग्यक्षेत्रात चालवण्यात येणारा आघाडीचा उपक्रम एम्पॉवर आणि सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (डीम्ड) युनिव्हर्सिटीच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीइंग यांनी एकत्र येऊन ‘रेजिंग रिसिलियन्ट युथ – फ्रॉम युनिव्हर्सिटी टू कम्युनिटी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केले. भारत सरकारच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाने या परिषदेला समर्थन दिले आहे. माननीय युवा कार्य व क्रीडा राज्य मंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी या परिषदेला समर्थन दिले असून, व्हर्च्युअल परिषदेच्या दुसऱ्या दिवशी उपस्थितांना संबोधित केले.

आपल्या स्वागतपर भाषणामध्ये एम्पॉवरच्या संस्थापिका व अध्यक्ष श्रीमती नीरजा बिर्ला यांनी सांगितले की, “विद्यार्थ्यांना यश मिळावे, त्यांचे कल्याण व्हावे यासाठी मानसिक आरोग्य सर्वाधिक महत्त्वाचे असते. गेल्या दशकभरात शैक्षणिक संस्थांनी मानसिक आरोग्याबाबत जागरूकता वाढवण्यासाठी सलग प्रयत्न न केल्यामुळे आजही यासंदर्भात काही मदत मागताना विद्यार्थी संकोच करत असल्याचे आढळते. सध्याच्या महामारीमुळे उत्पन्न झालेल्या परिस्थितीत विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य नीट राहावे यासाठी अनुकूल असे वातावरण निर्माण करण्यासाठी शिक्षण क्षेत्राने मोठ्या प्रमाणावर पावले उचलणे आवश्यक आहे. या परिषदेच्या माध्यमातून आम्ही प्रोत्साहक संवाद सुरु केला, उद्याचे भक्कम, मानसिकदृष्ट्या निरोगी नागरिक निर्माण करण्यात आम्हाला मदत करू शकेल अशी कृती योजना तयार करू शकलो आहोत.”

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (डीम्ड) युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ. एस. बी. मुजुमदार यांनी आपल्या भाषणात सांगितले, “सिम्बॉयसिस हे आरोग्याला प्रोत्साहन देणारे विद्यापीठ आहे. सिम्बॉयसिसमध्ये आम्ही आमच्या विद्यार्थ्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याबाबत विशेष काळजी घेतो. आज संपूर्ण जगभरात विलगीकरण हा सर्वात मोठा आजार बनलाय. आज आपण तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जोडले गेलो आहोत पण तरीही आपण एकेकटे आहोत. तरुणपिढी देशाच्या विकासाची इंजिन असते. जर आपल्या देशातले तरुण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी असतील तर आपल्याकडे वाढीची क्षमता आहे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याकडे विद्यापीठांनी विशेष लक्ष दिले पाहिजे.”

सिम्बॉयसिस इंटरनॅशनल (डीम्ड) युनिव्हर्सिटीच्या प्रकुलगुरू डॉ. विद्या येरवडेकर यांनी यावेळी सांगितले, “एसआययूने सिम्बॉयसिस सेंटर फॉर इमोशनल वेल-बीइंग सुरु केले असून डॉ गिरीजा महाले आणि त्यांची कौन्सेलर्सची टीम याचे नेतृत्व करत आहे. सिम्बॉयसिसच्या प्रत्येक कॅम्पसमध्ये कौन्सेलर आहे आणि त्यामुळे आमच्या विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो, खास करून सध्याच्या काळात त्यांची खूपच मदत झाली आहे. मानसिक आरोग्य ही अतिशय गंभीर बाब आहे. आपल्या युवा पिढीला प्रत्येक परिस्थितीचा, संकटांचा यशस्वीपणे सामना करता यावा यासाठी त्यांना मानसिक दृष्ट्या भक्कम करणे गरजेचे आहे, ही गरज पूर्ण करण्यासाठी उच्च शिक्षण संस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी समर्थक ठरतील अशा सेवांच्या मागणीमध्ये झालेली वाढच त्याची गरज किती तीव्र आहे ते दर्शवते. जेव्हा आपली युवा पिढी मानसिकदृष्ट्या भक्कम असेल तेव्हाच ते विद्यापीठाच्या बाहेर व्यापक समाजाला देखील मदत करू शकतील. एसआययूने एम्पॉवरच्या सहयोगाने उच्च शिक्षण संस्थांसाठी मानसिक आरोग्यासंदर्भात ‘रेजिंग रिसिलियन्ट युथ – फ्रॉम युनिव्हर्सिटी टू कम्युनिटी’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करून पुढचे पाऊल उचलले आहे.”

भारत सरकारचे माननीय युवा कार्य व क्रीडा राज्य मंत्री श्री. किरेन रिजिजू यांनी सांगितले, “मानसिक आरोग्य ही समस्या संपूर्ण जगभरात भेडसावत आहे. जसा समाज वाढतो, तशा मानसिक आरोग्याच्या समस्या देखील वाढतात. खासकरून विद्यार्थ्यांच्या बाबतीत मानसिक आरोग्य समस्या निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरतात. आज सर्वत्र असलेली तीव्र स्पर्धा हे त्यापैकी एक प्रमुख कारण आहे. विद्यार्थी अभ्यासात जरी खूप हुशार असले तरी त्यांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन योग्य असणे गरजेचे आहे. सर्वाधिक युवा लोकसंख्या असलेल्या जगभरातील देशांपैकी एक आपला भारत आहे, आपल्याला युवापिढीला शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या निरोगी ठेवण्यासाठी त्यांचा सर्वसमावेशक विकास साध्य करणे गरजेचे आहे. विद्यापीठांनी मानसिक आरोग्यविषयीची जागरूकता याचा समावेश त्यांच्या अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून केला पाहिजे. विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी धोरण संरचना निर्माण करण्यासाठी सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी आणि एम्पॉवर यांच्या या उपक्रमाला माझा संपूर्ण पाठिंबा आहे.”

या परिषदेमध्ये मानसिक आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिक, शिक्षक, धोरणकर्ते आणि उच्च शिक्षण क्षेत्रातील हितधारक जगभरातून सहभागी झाले होते. समाजाला लाभकारी ठरावे यासाठी मानसिक आरोग्य धोरणाला विशेष आकार देतील असे उपक्रम आणि सुधारणा यावर त्यांनी विचारविमर्श केला. या दोन दिवसांमध्ये एम्पॉवरच्या तज्ञांनी ५०० पेक्षा जास्त सहभागींना महत्त्वाचे मार्गदर्शन केले, हे व्हर्च्युअली या परिषदेमध्ये उपस्थित होते. एम्पॉवरचे सल्लागार मनोचिकित्सक डॉ. झिराक मार्कर यांनी ‘मेंटल हेल्थ ऑफ युथ – इंडियन सिनारियो: फोकस ऑन इंडियन कॅम्पसेस’ या विषयावरील पॅनल चर्चेमध्ये आपले विचार मांडले. एम्पॉवरच्या आउटरीच असोसिएट मानसशास्त्रज्ञ मिलोनी संघवी यांनी ही चर्चा घडवून आणली होती. एम्पॉवरचे आउटरीच अँड कोलॅबोरेशन्सच्या प्रमुख मानसशास्त्रज्ञ परवीन शेख यांनी ‘इंटरव्हेन्शन्स दॅट वर्क वेल इन युथ’ या विषयावर कार्यशाळा घेतली. एम्पॉवर – द सेंटर मुंबईच्या प्रमुख मनोचिकित्सक डॉ सपना बांगर यांनी ‘रेजिंग द जेन नेक्स्ट इन द डिजिटल एज’ या विषयावरील पॅनल चर्चेमध्ये आपले विचार मांडले. एम्पॉवरच्या आउटरीच असोसिएट, मानसशास्त्रज्ञ दिशा देसाई यांनी या चर्चेचे सूत्रसंचालन केले. एम्पॉवर – द फाऊंडेशनचे प्रमुख मनोचिकित्सक डॉ. अंबरीश धर्माधिकारी हे आणि सिम्बॉयसिस सेंटर फॉर इमोशनल वेलबीइंगच्या प्रमुख डॉ. गिरीजा महाले हे ‘मास्टर ऑफ द सेरेमनी’ होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button