राजकारण

भाजपासाठी रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप केले; नवाब मलिकांचा गंभीर आरोप

मुंबई : भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन पोलीस दलात बदल्या करण्यासाठी गैर प्रकार झाल्याचा आरोप केला आहे. त्यांच्या आरोपांना उत्तर देत नवाब मलिक यांनी पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावरच गंभीर आरोप केला आहे. फडणवीस हे सत्ता गेल्यामुळे हतबल झाले आहे. सरकार पाडता येत नाही आमदार फुटत नाही म्हणून वाटेल ते आरोप करत आहे. फडणवीस यांनी दिलेली माहिती संपूर्ण खोटी आहे. त्यांनी सरकारला बदनाम करण्याचे काम केले आहे, अशी टीका नवाब मलिक यांनी केली.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे मुख्यमंत्री असताना पोलीस बदली नियमावली त्यांना माहिती असताना देखील त्यांनी खोटे रिपोर्ट देत सरकारला बदनाम करण्याचे काम केले आहे’, असा पलटवार राष्ट्रवादी (NCP) नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Navab malik) यांनी केला आहे. तसंच, ‘रश्मी शुक्ला (rashmi shukla) यांनी परवानगी न घेता फोन टॅप केले. सरकार बनवण्याचे काम सुरू होते. शुक्ला फोन टॅप करत होत्या, त्या भाजपासाठी काम करत होत्या, असा गंभीर आरोप नवाब मलिक यांनी केला.

अनिल देशमुख हे क्वारंटाइन होते. ते कुठेही गेले नाही. पण त्यांच्याबद्दल फडणवीस खोटे आरोप करत आहे. जे अधिकारी दिल्लीत गेले. मुळात राज्यातून भाजप सरकार गेल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली. ते अधिकारी भाजपासाठी हे काम करत होते, असा आरोपही मलिक यांनी केला.
सचिन वाझे परत सेवेत घ्यावे असा सेनेचा दबाव होता. मुळात फडणवीस यांना हे माहिती होते ते सांगत होते, त्यांनी याबद्दल अॅडव्हकेट जनरल यांचा सल्ला मागितला नाही, असा सवालही नवाब मलिक यांनी केला.

जिलेटीन गाडीत स्फोटकं सापडली हा गंभीर विषय आहे. पण तपास भरकटण्याचे काम विरोधकांकडून केले जात आहे. सनसनाटी निर्माण करण्यासाठी एसीपी पाटील यांना हाताशी घेत परमबीर सिंग काम केले. गृहमंत्र्यांनी टार्गेट दिले हा आरोप सिंग यांचा खोटा ठरला आहे. खासदार मोहन डेलकर आत्महत्या केली. या प्रकरणात काही नाव घालणे हा सिंग यांचा आरोप खोटा आहे, असंही मलिक म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button