अर्थ-उद्योगतंत्रज्ञानशिक्षण

क्वेस्‍ट ग्‍लोबलकडून ‘इन्‍जेनियम’च्‍या १०व्या पर्वाच्‍या विजेत्‍यांची घोषणा

पुणे/ बेंगळुरू : क्वेस्‍ट ग्‍लोबल या जागतिक प्रोडक्‍ट इंजीनिअरिंग सर्विसेस कंपनीने १०व्‍या वार्षिक ‘इन्‍जेनियम’ स्‍पर्धेच्‍या विजेत्‍यांची घोषणा केली. अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांमध्ये नवसंकल्पनांची निर्मिती करण्याच्या उर्मीला तसेच उद्योजकतेसाठी आवश्यक विचारपद्धतीला खतपाणी देणे हा इन्‍जेनियमचा हेतू आहे. इन्जेनियमच्या माध्यमातून भारतातीलतरूण प्रतिभावान अभियंत्यांना आपले अभियांत्रिकीचे कौशल्य वापरून ख-याखु-या जगातील प्रश्‍न सोडविण्याची संधी देणारा एक मंच क्वेस्‍टकडून उपलब्ध करून दिला जात आहे. यंदा ६००० हून अधिक टीम्‍समधून विजेत्‍यांची निवड करण्‍यात आली आहे आणि त्‍यांच्‍या अद्वितीय संकल्‍पना, वास्‍तविक विश्‍वामध्‍ये उपयोजन, प्रात्‍यक्षिक क्षमता व किफायतशीरपणा या आधारावर त्‍यांची निवड करण्‍यात आली.

आम्‍हाला प्रथम विजेते ठरलेले पी.ई.एस. इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नोलॉजी (पीईएसआयटी), बेंगळुरू यांचे अभिनंदन करताना आनंद होत आहे. पीईएसआयटीचे लोगन्‍या सेन्थिल, नीरज अनिल बाबर व रोहन पिल्‍लई यांनी डॉक्‍टरांना पार्किसन्‍स आजाराच्‍या लवकर निदानामध्‍ये मदत करणारे सॉफ्टवेअर प्रपोझिशन निर्माण केले. ते आजाराचे निदान करण्‍यासोबत आजाराचे टप्‍पे ओळखण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. ज्‍यामुळे डॉक्‍टरांना आजाराच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये योग्‍य उपचार करण्‍यामध्‍ये मदत होईल.

नोएडा येथील बेनेट युनिव्‍हर्सिटीमधील पेनुमुडी तन्‍वी व व्‍यस्‍यराजू संपत राजू आणि मांड्या येथील पी.ई.एस. कॉलेज ऑफ इंजीनअरिंग (पीईएससीई) मधील मणिकांत अमरेश सवदत्ती व सूर्यकांत हे अनुक्रमे प्रथम व द्वितीय उपविजेते ठरले आहेत. बेनेट युनिव्‍हर्सिटीच्‍या विद्यार्थ्‍यांनी वेबवर इमेजचा शोध घेण्‍यासाठी लागणारा वेळ प्रभावीपणे कमी करणारे सोल्‍यूशन्‍स विकसित केले. दुस-या उपविजेत्‍याने आर्टिफिशियल इंटेलिजन्‍सचा वापर करून प्रगत, किफायतशीर रोबोची निर्मिती केली, जो हॉस्पिटल्‍समधील प्राथमिक आरोग्‍यसेवा प्रदात्‍यांसाठी सहाय्यक म्‍हणून काम करतो. हा रोबो औषधे,मुलभूत आरोग्‍य देखरेख आणि ऑडिओ व व्हिडिओ संदेश देत फ्रण्‍टलाइन कर्मचा-यांना रूग्‍णांशी करावा लागणारा संपर्क कमी करण्‍यामध्‍ये मदत करतो.

या घोषणेबाबत बोलताना क्वेस्‍ट ग्‍लोबलच्‍या डिलिव्‍हरी विभागाचे ग्‍लोबल हेड श्रीकांत नाईक म्‍हणाले, इन्‍जेनियम तरूण अभियांत्रिकी प्रतिभांना प्रयोगात्‍मक अध्‍ययनासाठी मंच देत लोक व आपल्‍या समुदायाला प्राधान्‍य देण्‍याप्रती असलेल्‍या क्वेस्‍टच्‍या कटिबद्धतेला दाखवते. विद्यार्थ्‍यांनी सादर केलेल्‍या संकल्‍पनांची सर्जनशीलता, स्थिरता व अद्वितीयता आपल्‍या देशाच्‍या तरूण अभियांत्रिकी प्रतिभांवरील माझा विश्‍वास अधिक दृढ करतात. मी आमचे प्रायोजक, वेबटेक कॉर्पोरेशन, भारत आणि इंजरसोल रॅण्‍ड टेक्‍नोलॉजीज अ‍ॅण्‍ड सर्विसेस प्रायव्‍हेट लिमिटेड यांचे तरूण अभियंत्यांनासमोरआणण्‍याच्‍या आणि प्रतिभा दाखवण्‍यास मंच देण्‍याच्‍या त्‍यांच्‍या संघटित दृष्टीकोनासाठी कौतुक करतो.

वेबटेक कॉर्पोरेशनच्‍या टेक्‍नोलॉजी अॅण्‍ड इंडिया इंजीनिअरिंगचे उपाध्‍यक्ष योगेश कुमार म्‍हणाले, वेबटेक नवोन्‍मेष्‍काराला प्राधान्‍य देते. आम्‍ही इन्‍जेनियमसाठी क्वेस्‍टसोबत सहयोग केला आहे. ही स्‍पर्धा आमच्‍या विश्‍वासाला अधिक दृढ करते आणि कंपनीसोबतच्‍या आमच्‍या प्रबळ सहयोगासाठी प्रमुख स्रोत आहे. मला आपल्‍या तरूणांकडून येत असलेल्‍या संकल्‍पना पाहून खूप आनंद होत आहे. त्‍यांच्‍यामध्‍ये उद्योगक्षेत्रांमध्‍ये निर्माण होणा-या भावी जटिल समस्‍यांचे निराकरण करण्‍याची खरी क्षमता आहे. सर्व विजेते व सहभागींचे अभिनंदन!

क्वेस्‍टसोबत सहयोग करण्‍याचा आणि आपल्‍या आसपासच्‍या समुदायांसाठी जीवन उत्तम करण्‍याचा आनंद होत आहे. समाजाच्‍या भल्‍यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणा-या अद्वितीय संकल्‍पनांवर भावी अभियंत्यांना काम करताना पाहून मला खूप आनंद होत आहे. मला सहभाग घेतलेल्‍या विद्यार्थ्‍यांचा अभिमान वाटत आहे. आमच्‍याकडून सर्व विजेत्‍यांना भविष्‍यासाठी हार्दिक शुभेच्‍छा, असे इंजरसोल रॅण्‍ड टेक्‍नोलॉजीज अ‍ॅण्‍ड सर्विसेस प्रायव्‍हेट लिमिटेडचे अभियांत्रिकी संचालक रमेश केव्‍ही म्‍हणाले.

इन्‍जेनियम उद्योग-शैक्षणिक संस्‍थांमधील पोकळी भरून काढण्‍यासाठी आणि सध्‍या उद्योगामध्‍ये असलेली कौशल्‍यासंदर्भातील पोकळी भरून काढण्‍यामध्‍ये मदत करतील असे कुशल कमर्चारीवर्ग निर्माण करण्‍यासाठी यशस्‍वीरित्‍या अभियांत्रिकी कौशल्‍ये वापरण्‍याप्रती असलेल्‍या कंपनीच्‍या कटिबद्धतेला दाखवते. मागील १० वर्षांपासून या वार्षिक मंचाने अभियांत्रिकी विद्यार्थ्‍यांची कौशल्‍ये ओळखण्‍याची, त्‍यांना पाठिंबा देण्‍याची आणि त्‍यांचे संगोपन करण्‍याची, तसेच त्‍यांना त्‍यांच्‍या संकल्‍पना जीवनात प्रत्‍यक्षात आणण्‍याच्‍या त्‍यांच्‍या स्‍वप्‍नांना पूर्ण करण्‍यास मदत करण्‍याची संधी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button