
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौऱ्यावर आहेत. खरं तर उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम सुरु आहे. त्यापार्श्वभूमीवर नेत्यांचे दौरे वाढलेले आहेत. पण पंतप्रधान मोदींचा हा दौरा फक्त निवडणूक दौरा म्हणून पहाता येणार नाही. तो काहीसा खास आहे. कारण तमाम हिंदूंचं श्रद्धास्थान असलेल्या वाराणसीचा कायापालट गेल्या काही काळात केला गेलाय. त्यातल्या अनेक प्रोजेक्टचा लोकार्पण सोहळा आयोगीत केला गेलाय. पंतप्रधान मोदी त्याचं उदघाटन करणार आहेत. अनेक नव्या प्रोजेक्टची पायाभरणीही मोदी करतील. यात सर्वात चर्चेत असलेला प्रोजेक्ट आहे काशी विश्वनाथ कॉरीडॉर. त्याची फक्त उत्तर प्रदेशच नाही तर देशभर चर्चा आहे. कारण ह्या एका प्रोजेक्टमुळे वाराणसीचा कायापालट झालाय.
वाराणसी हा खुद्द पंतप्रधानांचाही लोकसभा मतदारसंघ आहे. त्यामुळे ते दोन दिवस होमग्राऊंडवर असतील. १३ आणि १४ डिसेंबरला मोदी वाराणसीत असतील. दोन दिवसांचा हा दौरा ३० तासांचा असेल. आज सकाळी १० वाजता मोदी काशीत पोहोचतील. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि इतर प्रतिनिधी त्यांचं एअरपोर्टवर स्वागत करतील. पंतप्रधान मोदी हे एअरपोर्टहून संपूर्णानंद मैदानापर्यंत हेलिकॉप्टरनं जातील. त्यानंतर ते बाबा कालभैरवांच्या दर्शनासाठी रवाना होतील. त्या दर्शनसोहळ्यानंतर मोदी हे खिडकिया घाटावर जातील. त्यानंतर मात्र मोदी दुपारी दीड वाजता क्रुजमधून काशी विश्वनाथ कॉरीडॉरमध्ये प्रवेश करतील.
Tomorrow, 13th December is a landmark day. At a special programme in Kashi, the Shri Kashi Vishwanath Dham project will be inaugurated. This will add to Kashi's spiritual vibrancy. I would urge you all to join tomorrow's programme. https://t.co/DvTrEKfSzk pic.twitter.com/p2zGMZNv2U
— Narendra Modi (@narendramodi) December 12, 2021
काशी विश्वनाथ कॉरीडॉरमध्ये मोदी बराच वेळ घालवतील असं दिसतंय. १ वाजून ५० मिनिटांनी ते विश्वनाथ कॉरीडॉरचं लोकार्पण करतील. त्या कार्यक्रमानंतर पीएम मोदी हे बरेका गेस्ट हाऊसला पोहोचतील. सायंकाळी ते रो रो बोटीनं गंगा आरतीत सहभागी होतील. ही वेळ असेल ५.३० ची. यावेळी मोदींसोबत इतर नेते मंडळीही आरतीत असतील. नंतर ते परत मुक्कामाला बरेका गेस्ट हाऊसवर येतील.
कल का दिन भारत व हर भारतीय के लिए एक बहुत ही गौरवमयी दिन है, जब प्रधानमंत्री श्री @NarendraModi जी काशी में बाबा विश्वनाथ कॉरिडोर का लोकार्पण कर उसे देश को समर्पित करेंगे।
मोदीजी ने सदियों से उपेक्षित सनातन संस्कृति के आस्था केंद्रों का गौरव व वैभव लौटाने का भगीरथ कार्य किया है। pic.twitter.com/1IcIaoDpzc
— Amit Shah (@AmitShah) December 12, 2021
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशाताील वाराणसीच्या काशी विश्वनाथ धामचं लोकार्पण करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाची संपूर्ण तयारी झाली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने देश-विदेशातील पाहुणे काशीत येमार असल्याने देवालये, कुंड, गंगा घाट आदीची साफसफाईही करण्यात आली आहे. तसेच या परिसरात विद्यूत रोषणाई करण्यात आली आहे, त्यामुळे काशी शहर उजळून निघालं आहे. लोकार्पण सोहळ्यानंतर काशीतील प्रत्येक घरात प्रसाद आणि एक पुस्तक दिलं जाणार आहे. एवढी जय्यत तयारी योगी प्रशासनाने केली आहे.
।श्री काशी विश्वनाथो विजयतेतराम।
आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में काशी का पुरातन गौरव पुनर्स्थापित हो रहा है… pic.twitter.com/QGTIMTvHyl
— Yogi Adityanath (@myogiadityanath) December 12, 2021
१४ डिसेंबरचा कार्यक्रम
उद्या म्हणजेच १४ डिसेंबरला सकाळी साडे नऊ वाजता काशी वाराणसी महानगर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांसोबत मोदी बैठक करतील. ही बैठक अर्धा तास चालेल. सकाळी दहा वाजता भाजपच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक सुरु होईल. भाजपाशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं हे संमेलन चार तास चालण्याची शक्यता आहे. यात गुजरात, गोवा, हरयाणा, कर्नाटक, आसाम, अरुणाचलप्रदेश, मध्यप्रदेश, मणिपूर, त्रिपुरा, उत्तर प्रदेश, उत्तराखंडचे मुख्यमंत्री स्वत:च्या राज्यातल्या विकास कामांवर प्रजेंटेशन देतील. दुपारी २.३० वाजता मोदी मुख्यमंत्र्यांची बैठक आटोपून तीन वाजता स्वर्वैद मंदिरात जातील. तिथं मोदींचा अडीच तासाचा कार्यक्रम निर्धारीत आहे. इथं ते अनुयायी, भक्तांना संबोधीत करतील. स्वर्वेद मंदिराचा हा ९८ वा वार्षिकोत्सव आहे. तिथून मोदी सायंकाळी साडे चार वाजता दिल्लीसाठी रवाना होतील.
प्रधानमंत्री श्री @narendramodi ने विश्व की सांस्कृतिक राजधानी काशी को एक भव्य और दिव्य स्वरूप प्रदान करने का जो संकल्प लिया था, कल उसकी सिद्धि होने जा रही है।
श्री विश्वनाथ धाम प्रोजेक्ट को पूरे विश्व को समर्पित करके कल प्रधानमंत्रीजी भारत में एक नया सांस्कृतिक अध्याय लिखेंगे। pic.twitter.com/Ho9fGP26cE
— Rajnath Singh (@rajnathsingh) December 12, 2021




