भाजप नगरसेवकाकडून पूजा चव्हाणच्या लॅपटॉप, मोबाईलची चोरी
पुणे : पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळे खुलासे होत आहेत. आता याप्रकरणात भाजप विरुद्ध शिवसेना असे काहीस चित्र निर्माण झाले आहे. एका भाजप नगसेवकाने पूजा चव्हाणच्या घरात बेकायदेशीर घुसून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल गायब केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी शिवसेनेच्या बीड महिला जिल्ह्याप्रमुख संगीता चव्हाण यांनी पुण्यातील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
पूजाच्या मृत्यूनंतर पुण्यातील भाजप नगरसेवक धनराज घोगरे यांनी तिच्या घरात बेकायदेशीर रित्या घुसून तिचा लॅपटॉप आणि मोबाईल घेतला. त्यानंतर लॅपटॉप आणि मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केल्याचा गंभीर आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाली.
भाजपच्या नगरसेवकाने पूजा चव्हाणच्या लॅपटॉप आणि मोबाईलमधले फोटो आणि व्हिडिओ व्हायरल केले. बेकायदेशीर रित्या पूजाच्या मृत्यूनंतर तो तिच्या घरात घुसला आणि त्याने तिचा लॅपटॉप आणि मोबाईल चोरल्याचे कृत्य केलं, असा आरोप शिवसेनेच्या बीड महिला जिल्हाप्रमुखे संगीता चव्हाण यांनी केला आहे.