राजकारण

सचिन वाझेंच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला

मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे (Sachin Vaze) यांच्या राजीनाम्यासाठी राजकीय दबाव वाढत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात (Mansukh Hiren Death Case) वाझे संशयाच्या भोवऱ्यात अडकल्यामुळे विरोधकांकडून त्यांच्या अटकेची मागणी होत आहे. वाझेंच्या राजीनाम्यावरुन मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये दोन मतप्रवाह असल्याची माहिती आहे.

सचिन वाझे दोन दोन दिवसांपासून ठाण्याच्या राहत्या घरी आलेच नसल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. वाझेंचा राजीनामा आज घेण्यावरुन त्यांच्यावर राजकीय दबाव वाढत असल्याचं बोललं जातं. महाविकास आघाडी सरकारमध्येच सचिन वाझेंबद्दल दोन वेगवेगळे मतप्रवाह आहेत. एक गट वाझेंच्या राजीनाम्यावर ठाम आहे, तर दुसरा त्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button