Top Newsराजकारण

‘सेक्स वर्कर’ बनवून छळ; रियाज भाटीच्या पत्नीचा खळबळजनक आरोप

क्रिकेटर, राजकीय नेत्यांसोबत संबंध ठेवण्यास भाग पडले !

मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा साथीदार गुंड रियाझ भाटीवर त्याच्या पत्नीने गंभीर आरोप केले आहेत. आपल्या पतीवर सेक्स वर्कर बनवून तिचा छळ केल्याचा खळबळजनक आरोप तिने केला आहे. इतकंच नाही तर रियाझ भाटीच्या पत्नीने पतीवर हायप्रोफाईल लोकांसोबत, राजकीय नेत्यांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप केला आहे. महत्वाचे म्हणजे एका क्रिकेटरचे देखील नाव या प्रकरणात उघड झाले आहे. मुंबईतील सांताक्रूझ पोलीस ठाण्यात २४ सप्टेंबरला तक्रार दाखल केली आहे. अद्याप याप्रकरणी गुन्हा दाखल नाही.

एएनआय वृत्तसंस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार, गँगस्टर दाऊद इब्राहिमचा जवळचा सहकारी रियाझ भाटीच्या पत्नीने आरोप केला आहे की, तिच्या पतीने तिला हाय-प्रोफाइल लोकांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. भाटीसोबतच क्रिकेटरसह राजकीय लोकांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तिने मुंबई पोलिसांसमोर दाखल केलेल्या अर्जात ज्या लोकांवर बलात्काराचा आरोप केला आहे. रियाझ भाटीच्या पत्नीने भारतीय क्रिकेट संघाचा भूतपूर्व गोलंदाज मुनाफ पटेल, सध्याचा महत्वाचा खेळाडू हार्दिक पांड्या तसेच क्रिकेट बोर्डाचे पदाधिकारी राजीव शुक्ला यांच्यावर बलात्काराचा आरोप केले आहे. मुंबई पोलिसांनी अद्याप याप्रकरणी एफआयआर नोंदवलेला नाही. याबाबत पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास केला जाईल, अद्याप तपासात गुन्ह्याची माहिती समोर आलेली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button