Top Newsराजकारण

कोरोना आढावा बैठकीत पंतप्रधान मोदींकडून मुख्यमंत्र्यांची मुस्कटदाबी; केवळ ८ जणांना बोलू दिले!

नवी दिल्ली : देशभरात कोरोनाबाधित रुग्णांपैकी महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांतील मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. प्रकृतीच्या कारणामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या बैठकीला गैरहजर होते. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ‘या बैठकीमध्ये बोलण्याची संधीच मिळाली नाही, त्यामुळे लेखी स्वरूपात कळवावे लागले’ अशी माहिती दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येत दररोज मोठी भर पडत आहे. आज २ लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद झाली. त्यामुळे संपूर्ण देशभर चिंतेचे वातावरण पसरले आहे. देशात सध्या महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोना केसेसमध्ये सर्वाधिक वाढ असल्याचे काल, बुधवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. असे असूनही आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्व मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या कोरोना आढावा बैठकीत चिंताजनक परिस्थिती असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी मिळाली नसल्याचे समोर आले आहे. फक्त आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बैठकीत बोलण्याची संधी मिळाली. बाकीच्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांना त्यांच्या राज्यातील परिस्थिती, बेड्स, ऑक्सिजनची उपलब्धता इत्यादीं बाब लेखी स्वरुपात देण्यास सांगितले. यामध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

नऊ राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्याने होत आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरात या राज्यांचा समावेश आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या कोरोना आढावाच्या बैठकीमध्ये या नऊ राज्यांमधील फक्त चारच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना बोलण्याची संधी दिली. उर्वरित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना स्थानिक कोरोना परिस्थितीचा आढावा हा लेखी स्वरुपात केंद्राला पाठवला.

कर्नाटक, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, झारखंड, उत्तर प्रदेश, पंजाब, आसाम आणि मणिपूर या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोरोना काळात केंद्राकडून केलेल्या मदतीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींची आभार व्यक्त केले. या आठ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा पंतप्रधानांसमोर सादर केला. पण सर्वाधिक कोरोनाचा परिस्थिती बिकट असलेल्या महाराष्ट्र, दिल्ली, केरळ आणि गुजरातसारख्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना या बैठकीत बोलण्याची संधी मिळाली नाही.

कोरोनाबाधित आणि ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. अनेक राज्यात निर्बंध लावण्यात आले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक राज्यातील मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तब्येतीच्या कारणामुळे हजर नव्हते. त्यांच्याऐवजी आरोग्य मंत्री राजेश टोपे बैठकीला हजर होते, पण त्यांना बोलण्याची संधीच मिळाली नाही.

‘पोस्ट ऑपरेटिव्ह ट्रीटमेंमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अनुपस्थित होते. सलग २/३ तास त्यांना एका जागी बसणं शक्य नव्हतं. त्यामुळे लेखी पत्र देऊन मी महाराष्ट्राची बाजू मांडली. पंतप्रधानांनी ८ मुख्यमंत्र्यांना बोलू दिलं पण मला प्रत्यक्ष बोलून बाजू मांडायची संधी मिळाली नाही म्हणून आम्ही लेखी सादर केलं, अशी माहिती टोपे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांना तब्येत अडचणी असतील म्हणून ते अनुपस्थित होते. ते काळजी घेत आहेत, पण काम करत आहेत. अनेक बैठकींना ते उपस्थित होते. त्याबद्दल कोणी टिप्पणी करू नये, असं म्हणत राजेश टोपे यांनी चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button