मनोरंजन

सोनी लिव्‍हच्‍या ‘काठमांडू कनेक्‍शन’च्‍या सेटवर ‘पानी पुरी पार्टी’

लखनौ : पानी-पुरी, गोलगप्‍पे किंवा फुचके हे तोंडाला पाणी सुटणारे पदार्थ नेहमीच फूडप्रेमींना आकर्षून घेतात आणि फूडप्रेमींना देखील त्‍यांचा अधिकाधिक आस्‍वाद घ्‍यायला आवडते. विशेषत: तुम्‍ही लखनौ शहरामध्‍ये असाल तर एका पदार्थाचा आस्‍वाद घेतल्‍याशिवाय राहूच शकत नाही, तो म्‍हणजे ‘पानी के बताशे’. हा पदार्थ प्रत्‍येक पर्यटकाच्‍या आस्‍वाद घेण्‍याच्‍या पदार्थांच्‍या यादीमध्‍ये असलाच पाहिजे. नुकतेच सोनीलिव्‍हवरील आगामी क्राइम थ्रिलर सिरीज ‘काठमांडू कनेक्‍शन’च्‍या कलाकारांना शूटिंगदरम्‍यान स्‍वादिष्‍ट मेजवानी मिळाली. लखनौमधील शूटिंगदरम्‍यान कलाकार व टीमने वेळ काढून या स्‍वादिष्‍ट मिष्‍टान्‍नाचा आस्‍वाद घेतला. त्‍यांना हा पदार्थ इतका आवडला की त्‍यांनी सेटवरच ‘पानी पुरी पार्टी’ केली.

‘काठमांडू कनेक्‍शन’मध्‍ये अक्षा पर्दासनीने साकारलेली भूमिका शिवानी पानीपुरीची निस्‍सीम चाहती आहे. अभिनेत्रीने यासंदर्भात भूमिकेला खूपच गांभीर्याने घेतले. रोचक बाब म्‍हणजे प्रत्‍येक सीक्‍वेन्‍सनंतर तिला पानीपुरी खाण्‍याची सवयच लागली आणि तिच्‍यासोबत संपूर्ण टीम पानीपुरीचा मनसोक्‍त आस्‍वाद घेताना व अधिक पानीपुरी खाण्‍यास मिळण्‍याची वाट पाहताना दिसण्‍यात आली. सेटवरील कलाकार अमित सियाल व गोपाळ दत्त पासून दिग्‍दर्शक व टीमने त्‍यांचा डाएट नित्‍यक्रम बाजूला ठेवत मनसोक्‍तपणे पानीपुरीचा आस्‍वाद घेतला. पण हे करत असताना त्‍यांनी सुरक्षितताविषयक नियमांचे पालन देखील केले.

अक्षा पर्दासनी म्‍हणाली, ”मी निस्‍सीम चाट पदार्थप्रेमी आहे आणि सुदैवाने मी साकारत असलेली भूमिका शिवानीला देखील चाट पदार्थ आवडतात. मला एका सीक्‍वेन्‍समध्‍ये पानीपुरी खाण्‍याची शूटिंग करण्‍याचे सांगण्‍यात आले तेव्‍हा खूप आनंद झाला. सीनपेक्षा आम्‍ही शूटिंग संपण्‍याची वाट पाहायचो, ज्‍यामुळे सर्वजण एकत्र येऊन मेजवानीचा आस्‍वाद घेऊ शकू. खरंच आम्‍ही पानीपुरी पार्टीच केली, जी कोणीही कधीच विसरणार नाही.”

‘काठमांडू कनेक्‍शन’ लवकरच सादर होत आहे २३ एप्रिल रोजी सोनी लिव्‍हवर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button