‘एनआयए’चे महानिरीक्षक अनिल शुक्लांची बदली

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी स्फोटक प्रकरणात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे महाराष्ट्रातील ‘एनआयए’चे महानिरीक्षक अनिल शुक्ला यांची मिझोरमला बदली करण्यात आली आहे. शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली अंबानी स्फोटक प्रकरणाची चौकशी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत सचिन वाझे, विनायक शिंदे आणि रियाझुद्दीन काझी यांनाही अटक करण्यात आली आहे.
शुक्ला यांना अंबानी स्फोटक प्रकरणाच्या तपासात चांगले यश आले आहे. एनआयएचे पोलीस महानिरीक्षक अनिल शुक्ला यांच्या जागी ज्ञानेंद्र वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अनिल शुक्ला हे महाराष्ट्रात प्रतिनियुक्तीवर होते, त्यांना सहा वर्षे पूर्ण झाली होती.
मुकेश अंबानी स्फोटके प्रकरण तसेच मनसुख हिरेन हत्या प्रकरनाचा तपास त्याच्या मार्गदर्शनावावरून सुरू असताना त्यांच्या अचानक बदलीमुळे चर्चेला उधाण आले आहे. शुक्ला यांची त्यांच्या गृहराज्यात म्हणजेच मिझोरमला बदली करण्यात आली असून ते मिझोरम कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत.




