आरोग्य

देशात सलग तिसऱ्या दिवशी २ लाखांहून अधिक कोरोना रुग्ण; दिवसभरात १,३४१ जणांचा मृत्यू

नवी दिल्ली : देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. सलग तिसऱ्या दिवशी देशात २ लाखांहून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत. एवढेच नाहीतर कोरोना काळाच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत पहिल्यांदा २४ तासात १,३४१ जणांच्या मुत्यूची नोंद झाली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार गेल्या २४ तासांत देशात २ लाख ३४ हजार ६९२ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून १ हजार ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच १ लाख २३ हजार ३५४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १ कोटी ४५ लाख २६ हजार ६०९वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ७५ हजार ६४९ जणांचा मृत्यू झाला असून १ कोटी २६ लाख ७१ हजार २२० जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या १६ लाख ७९ हजार ७४० जणांवर उपचार सुरू आहेत.

देशभरात आतापर्यंत ११ कोटी ९९ लाख ३७ हजार ६४१ जणांचा कोरोना लसीकरण पार पडले आहे. १६ एप्रिलपर्यंत देशभरात २६ कोटी ४९ लाख ७२ हजार २२ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहे. यापैकी काल दिवसभरात १४ लाख ९५ हजार ३९७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button