
मुंबई : दिल्लीवारी करून परतलेले भाजपचे नेते आता राज्यात कामाला लागले आहे. आज मुंबईत भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
मुंबईत आज मार्मिक वर्धापन दिन सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला प्रवीण दरेकर यांनी हजेरी लावली. यावेळी दरेकर यांच्यामार्फत पूरग्रस्त भागांसाठी दीड कोटींची मदत देण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली. सुमारे १५ ते २० मिनिटं बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय प्रवीण दरेकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात काय चर्चा झाली याची राजकीय वर्तुळात उत्सुकता निर्माण झाली आहे.




