Top Newsराजकारण

भाजपला आव्हान देण्यासाठी ममता मैदानात; दिल्लीत बोलावली विरोधकांची बैठक

नवी दिल्ली : पश्चिम बंगाल निवडणुकीत विक्रमी विजय मिळवल्यानंतर आता मुख्यमंत्री ममता बॅनर्जी २६ ते ३०30 जुलैदरम्यान दिल्ली दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्या पंतप्रधान मोदींनाही भेटणार आहेत. मात्र, त्याच दिवशी त्यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबतही बैठकीचे आयोजन केले आहे. याच बरोबोर, या बैठकीसंदर्भात, ममता २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अँटी-बीजेपी फ्रंटची तयारी तर करत नाही ना? असे कयास लावायलाही सुरुवात झाली आहे.

तृणमूल काँग्रेसच्या सुत्रानुसार, दिल्ली दौऱ्यात ममता बॅनर्जी बंगा भवनमध्ये विरोधी पक्षांच्या वरिष्ठ नेत्याची भेट घेऊ शकतात. तसेच यासाठी त्यांनी निमंत्रणही पाठविले आहे. ही बैठक २८ जुलैला दुपारी तीन वाजता होईल असे समजते. यापूर्वी त्याच दिवशी ममता पंतप्रधान मोदींचीही भेट घेणार आहेत.

ममता बॅनर्जी यांनी २१ जुलैच्या बैठकीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि काँग्रेस नेते पी. चिंदबरम यांना विरोधी पक्षांच्या नेत्यांची एक बैठक आयोजित करण्यासंदर्भात सांगितले होते. या बैठकीसंदर्भात सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे. कोरोना नियंत्रणात राहिल्यास त्या थंडीच्या दिवसांतच शरद पवार आणि काँग्रेस अध्यक्षांसह विरोधी पक्षातील सर्व वरिष्ठ नेत्यांना ब्रिगेड परेड ग्राउंडवर रॅलीसाठी बोलावतील.

तत्पूर्वी २१ जुलैच्या ममतांच्या व्हर्च्युअल बैठकीत पवार आणि चिदंबरम यांच्या शिवाय एनसीपी नेत्या सुप्रिया सुळे, काँग्रेसचे दिग्विजय सिंह, सपा नेते राम गोपाल यादव, जया बच्चन, डीएमकेचे तिरुची सिवा, टीआरएसचे के. केशव राव, आरजेडीचे मनोज झा, शिव सेनेचे प्रियंका चतुर्वेदी आणि शिरोमणि अकाली दलचे बलविंदर सिंग भुंडर सहभागी झाले होते. हे सर्व पक्ष बंगा भवन येथे होणाऱ्या बैठकीसाठीही उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button