इतर

क्रूरकर्मा माडवी हिडमा सुरक्षा दलांच्या ‘हिट लिस्ट’वर

छत्तीसगडमधील नक्षली हल्ला; सुरक्षादलांसाठी मोठा धक्का

रायपूर : छत्तीसगडमधील बिजापूरच्या जंगलात नक्षलवादी (Naxal Attack) आणि भारतीय जवानांची चकमक झाली. यात 15 पेक्षा अधिक नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात जवांना यश आलं असली तरी या चकमकीत 22 जवान शहीद झाले. हा भारतीय सुरक्षादलांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

छत्तीसगडमधील नक्षलप्रभावित बीजापूर आणि सुकमा यात पसरलेल्या विस्तीर्ण जंगलात शनिवारी सीआरपीएफचे २००० जवान आणि नक्षलवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. कुख्यात नक्षलवादी हिडमा या जंगलात लपल्याची माहिती २० दिवसांपूर्वीच सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. मोठ्या संख्येने नक्षलवादी शस्त्रसाठा घेऊन येथे लपल्याने त्यांना पकडण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सापळा रचला होता . पण नक्षलवाद्यांनीच जवानांना ‘U चक्रव्यूहात फसवले व त्यांच्यावर रॉकेट लॉंचरने हल्ला केला. यात २५ जवान शहीद झाले आहेत. तर २३ हून अधिक जखमी झाले आहेत. पण जवानांनीही नक्षलवाद्यांना चोख प्रत्युत्तर देत ९ जणांचा खात्मा केला. मात्र नक्षलवाद्यांच्या ‘U चक्रव्यूहात अडकलेल्या जवानांना त्यातून बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.

दंडकारण्यातील या भागात नक्षलवाद्यांची PLGA बटालियन 1 ही कार्यरत आहे. ही बटालियन अत्यंत सामर्थ्यशाली असल्याचे सांगितले जाते. बिजापूर आणि आसपासच्या परिसरात त्यांची प्रचंड दहशत आहे. हा प्रभाव मोडून काढण्यासाठीच डीआरजी, एसटीएफ कोबरा आणि सीआरपीएफ यांच्याकडून ऑपरेशन प्रहार ही मोहीम राबवली जात होती. 3 एप्रिलला सुरक्षादलांना बीजापुर-सुकमा सीमारेषेवर असणाऱ्या तर्रेम डोंगराळ भागात नक्षलवादी असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सुरक्षादलाच्या तुकड्या रवाना करण्यात आल्या. 3 एप्रिलला दुपारी 12 वाजता जोनागुंडम आणि टिकलागुंडम या परिसरातील जंगलात नक्षलवादी आणि सुरक्षादलांचे जवान आमनेसामने आले.

नक्षलवाद्यांचा कमांडर हिडमा आणि त्याचे साथीदार बिजापूरच्या जंगलात डेरा टाकून बसल्याची माहिती सुरक्षादलांना मिळाली होती. हे नक्षलवादी घात लावून हल्ला करु शकतात, असा सावधानतेचा इशाराही देण्यात आला होता. कमांडर हिडमाच्या नेतृत्वाखाली या भागात 150 ते 160 नक्षलवादी छावण्या होत्या. हे नक्षलवादी कधीही सुरक्षादलांवर हल्ला करु शकतात, अशी माहिती होती. तरीदेखील ऐन वेळेला भारतीय जवानांचा घात झाला.

माओवाद्यांच्या पीएलजीए बटालियन नंबर-1चं नेतृत्व कमांडर हिडमा करत होता. याच बटालियनने जवानांवर हल्ला केला. त्यात एकूण 180 नक्षलवादी होते. पामेड एरिया कमिटीचे नक्षलवादी पलटन, कोंटा एरिया कमिटी, जगरगुंडा आणि बासागुडा एरिया कमिटीचीही त्यांना साथ मिळाली होती. त्यामुळे या नक्षलवाद्यांची एकूण संख्या 250 झाली आहे. सुरक्षा दलाचे जवान मात्र दोन किलोमीटरच्या परिसरात घेरले गेले होते. तसेच सर्व जवान एकत्र नव्हते. ही चकमक सुमारे 5 ते 6 तास चालली. म्हणजे शनिवारी 4 वाजल्यापर्यंत सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये प्रचंड धुमश्चक्री उडाली. या हल्ल्यात 9 नक्षलवादी मारले गेले आणि 12 नक्षलवादी जखमी झाल्याचा सुरक्षा दलाचा दावा आहे.

कोण आहे हिडमा?
कमांडर हिडमाविषयी भारतीय सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. सुरक्षादलांकडे असलेले त्याचे छायाचित्रही तरुणपणातील आहे. त्यामुळे कमांडर हिडमा आत्ता नेमका कसा दिसतो, हे कोणालाही माहिती नाही. मात्र, सुरक्षादलांच्या अंदाजानुसार कमांडर हिडमा साधारण 40 वर्षांची व्यक्ती आहे. हिडमाचे खरे नाव हिडमन्ना असून तो सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती गावाचा रहिवासी आहे. तो पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मीचा प्रमुख आहे. या दलात जवळपास 250 नक्षलवादी सामील आहेत. नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीमध्ये या हिडमाच्या गटाचा समावेश आहे.

अत्यंत कमी वयात हिडमा नक्षलवाद्यांच्या प्रमुख नेत्यांपैकी एक झाला आहे. त्याचा वावर अत्यंत गुप्त असल्याने त्याच्याविषयी सुरक्षादलांकडे फारशी माहिती उपलब्ध नाही. कमांडर हिडमाला पकडण्यासाठी 40 लाखांचे इनामही घोषित करण्यात आले आहे. भीम मांडवी प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेनेही कमांडर हिडमावर आरोपपत्र दाखल केले होते. हिडमा हा नक्षलवाद्यांच्या PLGA बटालियन 1 चे नेतृत्त्व करतो. पामेड, कोंटा, जगरगुंडा, बासगुडा हा परिसर या बटालियनच्या अखत्यारित येतो. नक्षलवाद्यांमध्ये माडवी हिडमा हा सर्वात क्रूर नक्षलवादी म्हणून ओळखला जातो. हिडमाच्या बटालियन आधुनिक शस्त्रांनी सज्ज असून जवानांच्या तुलनेत अधिक घातक शस्त्रात्रे त्यांच्याकडे आहेत. गोरिला अटॅकबरोबरच युद्ध रणनिती आखण्यात हिडमाचे नाव असून छत्तीसगड, आंध्र प्रदेश आणि तेलंगाणामध्ये हिडमा आश्रय घेत असतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button