लाईफस्टाईल

उन्हाळ्यातही चेहरा उजळ आणि नितळ ठेवा…

सध्या राज्यात उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे. त्यातच नोकरदार महिलांना प्रचंड उन्हाचा जास्त त्रास सहन करावा लागतो. परंतु अशा परिस्थितही आपल्या चेहऱ्यांचे सौदर्यं कसे टिकवून ठेवायचे याबाबतच्या वाचा टीप्स

स्किन एक्सफोलिएट
फक्त चेहरा नाही. तर संपूर्ण बॉडी एक्सफोलिएट करणे गरजेचे आहे. सुंदर चेहरा असण्याचा मुलभूत नियम म्हणजेच एक्सफोलिएट करणे होय. यामुळे चेहऱ्यावरील मृत पेशी काढून टाकण्यास मदत होते. दररोज हजारोंच्या संख्येने आपल्या चेहऱ्यावरच्या पेशी मृत होत असतात. या पेशी चेहऱ्यावरच राहिल्यास त्याने चेहऱ्याचा रंग डार्क दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही कितीही मॉइश्चराइजर वापरा त्याने तुमची त्वचा उजळणार नाही.
त्यामुळे चेहऱ्याचे एक्सफोलिएट करणे गरजेचे असते. त्यावेळी सोबत बॉडी स्क्रबर वापरावा. एक्सफोलिएट झाल्यानंतर ताज्या पाण्याने चेहरा धुवून घ्या. उजळत्या चेहऱ्यासाठी हे आठवड्यातून तीन वेळा करणे गरजेचे आहे.

कमीत कमी मेकअप
उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये मेकअपचा वापर कमी करावा. उन्हाळ्यात घाम आणि धुळीमुळे त्वचेवर वाईट परिणाम होतो. मेकअप केल्यामुळे चेहऱ्याचे नुकसान होते.

पाण्याचा जास्तीत जास्त वापर करा
उन्हाळ्यात पाणी तुमचं सर्वस्व असलं पाहिजे. आरोग्यदायी चेहरा आणि तब्बेतीसाठी शरिराला पुरेसे पाणी देणं गरजेचं आहे. दररोज आपण तीन ते चार लीटर पाणी पिणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येक अर्धा तासाला पाणी पिणे गरजेचे आहे.

लोशन लावा
रात्री झोपण्याच्या आधी ऑईल फ्री लोशन लावायला विसरू नका. सकाळी अंघोळ झाल्यानंतर तर हे लावायलाच हवे. यासाठी लाईट आणि लवकर शोषणाऱ्या लोशनचा वापर करावा.

सनग्लासेसचा वापर करा
सनग्लासेसचा वापर केल्याने डोळ्यांना आराम मिळतो. ग्लासचा वापर केल्यास अति उन्हामुळे डोळ्यांच्या नाजुक त्वचा खराब होण्यापासून बचाव होतो. तसेच डार्क सर्कल येत नाहीत.

सनस्क्रीन
उन्हात जाण्याआधी चांगल्या गुणवत्तेचा सनस्क्रीन लावणे फायद्याचे ठरते. नेहमी उन्हात जात असाल तर सनस्क्रीन विसरू नका. जर तुमचा चेहरा ऑईली असेल तर चुकूनही ऑईल बेस सनस्क्रीन वापरू नका.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button