उत्तर प्रदेशात भाजपची पहिली यादी जाहीर; मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ गोरखपूरमधूनच लढणार
नवी दिल्ली : उत्तर प्रदेश निवडणुकांची घोषणा होताच राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसने आपली पहिली यादी जाहीर केली होती. त्यामध्ये, उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईला उमेदवारी दिली आहे. आता, भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून तिकीट न देता गोरखपूरमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षाकडून आपल्या १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आलीय. या निवडणुकीत ४० टक्के महिलांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यात उन्नाव बलात्कार पीडितेच्या आईलाही तिकीट देण्यात आल्याची माहिती, उत्तरप्रदेश काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी दिली आहे. आता, भाजपने ५८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. भाजप नेते आणि मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी याबाबत माहिती दिली. दुसऱ्या टप्प्यात ३८ ते ५५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येईल, असे प्रधान यांनी सांगितले. भाजपने मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अयोध्येतून उमेदवारी न देता गोरखपूर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तर उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांना प्रयागराज जिल्ह्यातील सिराथू येथून उमेदवारी देण्यात आली आहे.
योगी सरकारमधील अनेक मंत्र्यांना नारळ मिळणार अशी शक्यता व्यक्त केली जात होती. ते खरं ठरलं आहे, कारण सरकारमधील २० विद्यमान आमदारांना नारळ दिल्याचं जाहीर झालंय. हे २० आमदार आता समाजवादी पार्टीत जाणार का? किंवा नाराज आमदार अपक्ष म्हणून उभे राहणार? याचा फायदा अखिलेश यादव यांना कितपत होईल येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. पत्रकार परिषद सुरू असताना केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी योगी आदित्यनाथ यांची उमेदवारी जाहीर करीत असताना त्यांचं कौतुकं केलं.
विशेष म्हणजे भाजपकडून युपीत २१ नव्या चेह-यांना संधी दिली आहे. त्यामध्ये तरूण महिला, समाजसेविका आणि डॉक्टरांचा समावेश असल्याचे केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान आणि भाजपचे राष्ट्रीय महासचिव अरुण सिंह यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.
भाजप उमेदवारांची पहिली यादी
योगी आदित्यनाथ- गोरखपूर शहर, केशव प्रसाद मौर्य- प्रयागराज सिराथू, कैराना- श्रीमती मृगांका सिंह, थानागांव- सुरेश राणा, शामली- तेजेंद्र सिंह नरवाल, बुढ़ाना- उमेश मलिक, चरथावल- सपना कश्यप, मुजफ्फरनगर- कपिल देव अग्रवाल, खतौली- विक्रम सैनी, मीरापुर- प्रशांत गुर्जर, सरधना- संगीत सोम, हस्तिनापुर- दिनेश खटिक, मेरठ कैंट- अमित अग्रवाल, किठोर- सत्यवीर त्यागी, मेरठ- कमल दत्त शर्मा, मेरठ साउथ- सुरेंद्र तोमर, छपरौली- सहेंद्र सिंह रमाला, बड़ौत- कृष्णपाल मलिक, बागपत- योगेश धामा, लोनी- नंद किशोर गुर्जर, मुरादनगर- अजित पाल त्यागी, साहिबाबाद- सुनील शर्मा, गाजियाबाद- अतुल गर्ग, मोदीनगर- मंजू सिवाच, धौलाना- धर्मेश तोमर, हापुड़- विजय पाल, गढ़मुक्तेश्वर- हरेंद्र चौधरी तेवतिया, नोएडा- पंकज सिंह, जेवर- धीरेंद्र सिंह, शिकारपुर- अनिल शर्मा, सिंकदराबाद- लक्ष्मी राज सिंह, बुलंदशहर- प्रदीप चौधरी, अनूपशहर- संजय शर्मा, स्याना- देवेंद्र सिंह लोधी, डिबाई- चंद्र पाल सिंह, खुर्जा- मीनाक्षी सिंह, मांट- राजेश चौधरी, गोवर्धन- ठाकुर मेघश्याम सिंह, बटेर- पूरन प्रकाश, एत्मादपुर- डॉ. धर्मपाल सिंह, आगरा कैंट- जीएस धर्मेश, आगरा दक्षिण- योगेंद्र उपाध्याय, आगरा उत्तरी- पुरुषोत्तम खंडेलवाल, आगरा देहात- बेबी रानी मौर्य, फतेहपुर सीकरी- चौधरी बाबूलाल, खैरागढ़- भगवान सिंह कुशवाहा,
दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांची यादी
बेहट- नरेश सैनी, सहारनपुर नगर- राजीव गुंबर, सहारनपुर- जगपाल सिंह, देवबंद- बृजेश सिंह रावत, रामपुर – मनिहारन देवेंद्र, गंगोह- कीरत सिंह गुर्जर, नगीना- डॉ. यशवंत, बरहाकोट- सुकांत सिंह, नरहौट- ओमकुमार, बिजनौर- शुचि मौसम चौधरी, चांदपुर- कमलेश सैनी, नोहपुर- सीपी सिंह, कांठ- राजेश कुमार चुन्नू, मुरादाबाद नगर- रितेश गुप्ता, कुंदरकी- कमल प्रतापति, चंदौसी- गुलाबो देवी, असमौली- हरेंद्र सिंह रिंकू, संभल- राजेश सिंहल, चमरौआ- मोहन कुमार लोधी, रामपुर – आकाश सक्सेना, मिलट- राजबाला, धनौरा- राजीव सरारा, नौगांव- देवेंद्र नागपाल, हसनपुर- महेंद्र सिंह खडगवंशी, बिसौली- कुशाग्र सागर, बिल्सी- हरीश शाक्य, बदायूं- महेश गुप्ता, शेखपुर- धर्मेंद्र शाक्य, नीलगंज- डॉ. डीसी वर्मा, फरीदपुर- श्याम बिहारी लाल, बरेली- डॉ. अरुन सक्सेना, बरेली कैंट- संजीव अग्रवाल, आंवला- धर्मपाल सिंह, कटरा- वीर विक्रम सिंह, वाया- चेत राम पासी, शाहजहांपुर- सुरेश खन्ना.