आरोग्य

जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना लसीला मंजुरी

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या दुसऱ्या लाटेचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं, तरी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रानं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आता भारतात ग्लोबल हेल्थकेअर प्रमुख जॉन्सन अँड जॉन्सनच्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधात्मक लसीला मान्यता देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्यमंत्री मनरसुख मांडविया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. भारतानं आपल्या वॅक्सिन बास्केटचा विस्तार केला आहे. जॉन्सन अँड जॉन्सन च्या सिंगल डोसच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे ५ लसी आहेत, असं मांडविया म्हणाले. ६ ऑगस्ट रोजी कंपनीनं माहिती देत आपल्या सिंगल डोस लसीच्या आपात्कालिन वापरास अर्ज केल्याचं सांगितलं होतं. ५ ऑगस्ट २०२१ रोजी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडनं भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरासाठी अर्ज केला होता, असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. सध्या देशात कोवॅक्सिन, कोविशील्ड आणि रशियाच्या स्पुटनिकचे डोस नागरिकांना देण्यात येत आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.

देशामध्ये लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ होत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समोर आलं आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ३९ कोटी तर दुसरा डोस पूर्ण करणाऱ्या ११ कोटी नागरिकांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button