आरोग्य

लॉकडाऊनचा निर्णय, नियमावली आजच जाहीर होण्याची शक्यता : अस्लम शेख

मुंबई : कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढू लागला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात जवळपास लॉकडाऊन होणार हे निश्चित झालं आहे. मात्र, कधीपासून जाहीर होणार याबाबत काहीच स्पष्ट नाही आहे. दरम्यान, लॉकडाऊनचा निर्णय आजच होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर लॉकडाऊनबाबत नियमावली (जच तयार होईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिली. कुणाशी चर्चा न करता लॉकडाऊन लावण्याची केंद्रानं केलेली चूक आम्ही करणार नाही, असं देखील अस्लम शेख म्हणाले.

सरकार कोरोनाची साखळी तोडण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांनीही हे समजून घेतलं पाहिजे. एका आठवड्यापासून सरकार प्रयत्न करत आहे. पण कुठेही रुग्ण कमी झाल्याचं दिसत नसल्यामुळे लॉकडाऊनबाबतचा निर्णय सरकार आजच घेण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले. कोरोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाऊन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केलं आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे, असं अस्लम शेख म्हणाले.

अस्लम शेख म्हणाले, गेल्या आठवड्यापासून आपण बैठका घेऊन विरोधी पक्षाच्या लोकांना विश्वासात घेत आहोत. टास्क फोर्सशी चर्चा झाली. ब्रेक द चेन यानुसार आज निर्णय होईल. लॉकडाऊन करणे गरजेचं आहे. साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन करावं लागणार आहे. त्याबाबत नियमावली आज जाहीर होणार आहे. परप्रांतियांना आपण घरी जाण्यासाठी अडवत नाही, असंही अस्लम शेख यांनी सांगितलं.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button