शिक्षण

सॅमसंग इनोव्हेशन लॅबचे उद्घाटन

नवी दिल्ली : सॅमसंग इंडियाने दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (डीटीयु) येथे, सॅमसंग इनोव्हेशन कँम्पस इनिशिएटीव्ह अंतर्गत सॅमसंग इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन केले व त्याच्या अलिकडील व्हीजन #PoweringDigitalIndia चा भाग असलेल्या गव्हर्नमेंट स्किल इंडिया साठी त्यांची बांधीलकी अधिक मजबूत केली.

लॅब मध्ये, डीटीयु मधील विद्यार्थी आणि फॅकल्टी अॅडव्हान्स टेक्नॉलॉजी प्रशिक्षण आणि संयुक्त संशोधन सहयोगाअंतर्गत अप्लिकेशन फ्रेमवर्क, मल्टिमीडिया, आरोग्य व सुरक्षा या डोमेन्समध्ये कार्य करुन विद्यार्थ्यांना इंडस्ट्री-रेडी ठेवण्याचे काम करणार आहे.

याबरोबर, सॅमसंग कडे आता संपूर्ण भारतात सॅमसंग इनोव्हेशन कॅम्पस इनिशिएटीव्ह, ज्यास पूर्वी सॅमसंग डिजिटल अकॅडेमी म्हणून ओळखले जात असे, त्याअंतर्गत आठ टेक्निकल लॅब्स आहेत. लॅबचा भाग म्हणून, सॅमसंग आर अँड डी इन्स्टीट्युट, नोएडा(एसआरआय-एन) येथे इंजिनीयर्स डीटीयु विद्यार्थी व फॅकल्टी यांच्या बरोबर सहयोगपूर्ण संशोधन प्रकल्पांमध्ये स्मार्टफोन डोमेन्स वर आर्टीफिशियल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग आणि कंप्युटर व्हीजन सारख्या कटींग एज टेक्मॉलॉजी क्षेत्रांमध्ये काम करणार आहेत. आतापर्यंत, 200 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी एसआरआय-एन इंजिनीयर्स बरोबर संशोधन प्रकल्पांवर काम केले असून प्रशिक्षण प्राप्त केले आहे. विद्यार्थ्यांना या प्रकल्पांवर एसआरआय-एन इंजिनीयर्स बरोबर रीसर्च पेपर प्रकाशित करण्यासाठी देखील प्रोत्साहन देण्यात येते.

डीटीयु येथे सॅमसंग इनोव्हेशन लॅब चे उद्घाटन प्रोफेसर योगेश सिंग, व्हाइस चँसलर, डीटीयु, क्युनग्युन रु, व्यवस्थापकीय संचालक, एसआरआय-एन, प्रोफेसर रजनी जिंदाल, विभाग प्रमुख, कंप्युटर सायन्स व इंजिनीयरींग, डीटीयु आणि कंप्युटर सायन्स व इंजिनीयरींग च्या फॅकल्टी आणि डीटीयु येथील सॅमसंग इनोव्हेशनलॅब चे नेतृत्व करणाऱ्या डॉ. दिव्यशिखा सेठीया यांच्याद्वारे करण्यात आले.

“एसआरआय-एन कोलॅबरेटीव्ह रीसर्च प्रोजेक्ट्स वर अनेक वर्षांपासून प्रीमियर युनिव्हर्सीटीज बरोबर कार्य करत आहे आणि आम्हाला उत्तम परिणाम प्राप्त होत आहेत. आम्ही डीटीयु येथील नवीन लॅब बद्दल अतिशय उत्तेजित आहोत, जेथे आमचे इंजिनीयर्स विद्यार्थ्यांना कटींग एज टेक्नॉलॉजीबद्दल शिकवणार आहेत, आणि विद्यार्थ्यांना डिसरप्टीव्ह इनोव्हेशन वर काम करण्यास मदत करणार आहेत. आम्हाला खात्री आहे हे विद्यार्थ्यांना भविष्यात रोजगार मिळवण्यासाठी तयार करेल,” असे कुंगयुन रु, व्यवस्थापकीय संचालक,सॅमसंग आर अँड डी इन्स्टीट्युट, नोएडा म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button