फोकसमनोरंजन

पॉर्न फिल्मचा उद्योग कसा केला? राज कुंद्राचेच कर्मचारी करणार पोलखोल

मुंबई : पॉर्न रॅकेटमध्ये अडकलेला उद्योगपती राज कुंद्रा याच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. कंपनीचे चार कर्मचारी हे साक्षीदार बनले आहेत. त्यामुळे आता राज कुंद्रा विरोधात मुंबई क्राईम ब्रांचच्या प्रॉपर्टी सेलकडे महत्त्वाचा दुआ हाती लागला आहे. इतकंच नाही तर राज कुंद्रानं दीड वर्षात पॉर्न फिल्म म्हणून सुमारे २० कोटी रुपये कमवले याचा सुद्धा तपासात उघड झालं आहे.

राज कुंद्राच्या अंधेरी येथील ऑफिसची प्रॉपर्टी सेलकडून झडती घेण्यात आली. ज्यात त्यांना एक गुप्त कपाट सुद्धा सापडलं आहे. त्यामध्ये काही बॉक्स फाईली होत्या. ज्यात क्रिप्टो करन्सी संदर्भातील माहिती होती. म्हणजेच राज कुंद्रा क्रिप्टो करेंसी म्हणजेच डिजिटल पैशांमध्ये सुद्धा व्यवहार करत असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. पॉर्न फिल्म बनवून कमावलेले पैसे हे केंरीन कंपनीला पाठवले जायचे मात्र केंरीन कंपनीतून ते पैसे एका विशिष्ट माध्यमातून पुन्हा राज कुंद्राला भेटायचे. हे पैसे कुठच्या मार्गाने येत होते याचा तपास प्रॉपर्टी सेलकडून केला जातोय.

क्राईम ब्रांचने दोन दिवसांपूर्वी राजच्या अंधेरी येथील वियान इंडस्ट्रीज या कंपनीच्या ऑफिसवर छापा मारला होता. या झडतीमध्ये पोलिसांच्या हाती एक गुप्त तिजोरी लागली. या तिजोरीमध्ये अनेक महत्वाच्या फाईल ठेवल्या होत्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या फाईलमध्ये राजने ब्रिटीश कंपनीसोबत केलेल्या आर्थिक व्यवहारांची माहिती आहे. राज कुंद्रा चालवत असलेली ॲडल्ट वेबसाईट ‘हॉटशॉट’च्या कंटेंटसाठी रोज नवा व्हॉट्सॲप ग्रुप बनवला जायचा असाही खळबळजनक खुलासा या प्रकरणात समोर आला आहे. त्यामुळे सायबर क्राईम ब्रांचकडून वाचण्यासाठी सगळी तयारी करण्यात येत होती हे ही आता समोर येत आहे

राज कुंद्रानं प्रॉपर्टी सेलला दिलेल्या आपल्या जबाबात सांगितलं की त्याचा आणि हॉटशॉटचा काही संबंध नाही. त्यांनी ते बनवलं आणि ते विकलं त्याचा फक्त मेंटेनन्स तो करायचा. मात्र त्याचं हाच जबाब पोलिसांना संशय घेण्यास प्रवृत्त करत आहे. कारण फक्त चार महिन्यांसाठी हे मेंटेनन्स करण्यात आलं होतं. इतक्या कमी कालावधीसाठी कुणीही मेंटेनन्स हाती घेत नाही. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज कुंद्रा चौकशीमध्ये हवं तसं सहकार्य करत नाही. पोर्न फिल्म रॅकेटमध्ये राज कुंद्राचे चार कर्मचारीच त्याच्याविरोधात साक्ष देणार आहेत. कशाप्रकार हे रॅकेट चालायचं याची संपूर्ण माहिती कर्मचाऱ्यांनी प्रॉपर्टी सेलला दिली असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button