नीता अंबानी यांच्याहस्ते ‘हर सर्कल’चे अनावरण

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च) प्रसिद्ध समाजसेविका व उद्योजक श्रीमती नीता मुकेश यांनी ‘हर सर्कल’ या तंत्रस्नेही मंचाची घोषणा केली आहे. ‘हर सर्कल’ हा तंत्र क्रांतीच्या क्षमतेद्वारे महिलांचे सामर्थ्य एकत्रित नोंदिवणारा एक अनोखा नवीन उपक्रम आहे. महिलांमधील सक्षमीकरणाला प्रोत्साहित करणे आणि जागतिक स्तरावर त्यांच्यामधील सुसंवाद, प्रतिबद्धता, सहयोग आणि परस्पर समर्थनाच्या ध्येयासाठी अशाप्रकारचा हा पहिलाच तंत्र मंच मानला जात आहे.
भारतीय महिलांपासून सुरुवात होणारा ‘हर सर्कल’ हा मंच जगभरातील महिलांच्या सहभागासाठीही खुला आहे. एक सर्वसमावेशक मजकूर, समाज माध्यम आणि ध्येय-पूर्ती करणारा हा मंच असून तो सर्व सामाजिक पार्श्वभूमीच्या महिलांच्या वेगाने वाढणा-या आकांक्षा, महत्वाकांक्षा, त्यांचे स्वप्न आणि क्षमता यांना पूर्ण करतो.
‘हर सर्कल’च्या सादरीकरणप्रसंगी रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा श्रीमती नीता एम. अंबानी म्हणाल्या, “जेव्हा स्त्रिया या स्त्रियांवर अवलंबून असतात तेव्हा अविश्वसनीय घटना घडतातच! याची मला उत्तम जाणीव आहे.
माझे संपूर्ण आयुष्य मी अशा सशक्त स्त्रियांनी समृद्ध आहे. त्यांकडून मी क्षमा, विनम्रता आणि सकारात्मकता शिकले आहे; आणि त्या बदल्यात मी वेळोवेळी माझी शिकवण इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. 11 मुलींच्या कुटुंबात मोठी झालेली मुलगी म्हणून मला लहानपणापासून आत्मविश्वासाची शिकवण मिळत गेली. माझी कन्या ईशाकडून मला निर्वाज प्रेम आणि स्वप्नपूर्तीचा विश्वास मिळाला आहे. माझी सून श्लोकाकडून मी सहानुभूती आणि धैर्य शिकले आहे. रिलायन्स फाऊंडेशनमधील एखादी महिला असो किंवा मी काम केलेल्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील कोणतेही महिला नेतृत्व असो, आम्हा महिलांचे सामायिक अनुभव नेहमी आमच्या संघर्षाखेरिस आणि विजयाच्या शेवटी एकमेकांजवळ एकत्रित होणारेच असतात.”
“आज मला या गोष्टीचा आनंद आहे की, आम्ही HerCircle.in या तंत्रस्नेही मंच माध्यमातून कोट्यवधी महिलांसाठी अशा प्रकारचे समर्थन व एक्य निर्माण करू शकतो. ‘हर सर्कल’ हा तंत्रस्नेही मंच प्रत्येक महिलेला सहभागी होण्यासाठी आणि स्वयंपूर्ण होण्यासाठी आवाहन करत आहे. अविरत जागतिक संपर्कसाखळी आणि सहकार्य निर्मितीसह सक्षम तंत्रज्ञान क्रांतीच्या माध्यमातून ‘हर सर्कल’ हा मंच सर्व संस्कृती, समुदाय आणि देशांमधील महिलांच्या संकल्पनांचे आणि उपक्रमांचे स्वागत करतो. आम्ही या मंचाच्या निमित्ताने महिलांसाठी समानतेची कास धरतो.” श्रीमती अंबानी सांगतात.
‘हर सर्कल’ कसे काम करते?
एकाच छताखाली संपर्कसाखळी आणि लक्ष्य-पूर्ती : ‘हर सर्कल’ची रचना महिलांशी संबंधित मजकूर व सामाजिक उन्नतीसाठी एकाच छताखाली सेवा देणारी म्हणून केली आहे. या समाज मंचाद्वारे सर्व महिलांना एकमेकांशी जोडले जाईल. संबंधित विषयाचे व्हिडिओ, लेख, दैनंदिन आयुष्याशी संबंधित मार्ग काढणारी धोरणे, सैदर्य तसेच फॅशन, मनोरंजन, स्वयं प्रकटीकरण, महिलांमार्फत चालविले जाणा-या सामाजिक वा अन्य संस्थांद्वारे सार्वजनिक जीवनातील सक्रीय सहभाग याद्वारे महिला आपले योगदान देऊ शकतील.
‘हर सर्कल’ हा तंत्र मंच रिलायन्सच्या आरोग्य, शिक्षण, उद्योजकता, वित्त, दातृत्व, मार्गदर्शन आणि नेतृत्व या विषयातील तज्ज्ञांच्या चमूंकडून महिलांच्या शंकांचे निरसनही करेल. कैशल्य अद्ययावतता आणि रोजगार या विषयावरील विभाग महिलांमधील नवीन व्यावसायिक कैशल्य पारखून त्यांना योग्य रोजगार उपलब्ध करून देईल. उपलब्ध तंत्रस्नेही अभ्यासक्रमाच्या माध्यमातून तसेच उत्तम व्यवसाय क्षेत्रातून महिलांची शैक्षणिक प्रगती होऊ शकते. ‘हर सर्कल’ हा मंच महिलांच्या संघर्षातील यशस्वी गोष्टी मांडण्यासाठी प्रोत्साहन देईल. यामुळे इतरांना प्रेरणा, आशा आणि विनम्रतेचा पाठ मिळेल.
खाजगी, व्यक्तिगत, सुरक्षितः व्हिडिओ, लेखातील मजकूर सर्वांसाठी खुला आहे. तर सोशल नेटवर्किंगचा भाग हा फक्त महिलांसाठी आहे. सामाजिक संपर्क महिलांना सामायिक, स्वारस्य असलेले नवीन मित्र बनविण्यासाठी किंवा कोणताही संकोच न करता प्रश्न विचारण्यासाठी एक सुरक्षित मंच महिला-फोरम प्रदान करेल. ‘हर सर्कल’मध्ये महिलांना गोपनीय चॅटरूममध्ये वैद्यकीय आणि वित्त तज्ज्ञांना प्रश्न विचारण्यासाठी एक विशेष आणि वैयक्तिक विभागही आहे.
‘हर सर्कल’ हॅबिट अॅप: सुरक्षित आणि वैयक्तिकृत वातावरणात उपयुक्त आणि उन्नत मजकूर, सोशल नेटवर्किंग आणि तज्ज्ञांचा सल्ला देण्याव्यतिरिक्त ‘हर सर्कल’ वापरकर्त्यांस योग्य सवय लावण्यास आणि टिकवून ठेवण्यास सक्षम करण्यासाठी अॅप प्रदान करते. यामुळे वापरकर्त्याना योग्य ते मिळते आणि खरे व समर्थक मित्रही मिळतात. एखाद्या महिलेला शारीरिकदृष्ट्या अगदी फिट राहायचे असेल तर आमच्याकडे फिटनेस ट्रेकरही आहे. तिला आर्थिक बाबतीत काही शंका असतील तर आमच्याकडे अर्थ सल्लागार, नियोजनकारही आहे. तिला तिच्या पीरियडबाबत काही जाणून घ्यायचे असेल तर त्यातील तज्ज्ञही आहेत. समजा एखादीला यावर्षी मूल हवे आहे, तर आमच्याकडे प्रजनन मार्गदर्शक आहेत. तिला गर्भधारणा मार्गदर्शक हवा असेल तर तेही आम्ही देऊ.
‘हर सर्कल’ हे डेस्कटॉप आणि मोबाइल माध्यमाशी सुसंगत असे एक संकेतस्थळ आहे. आणि ते Google Play Store आणि My Jio App Store वर विनामूल्य अॅप म्हणून उपलब्ध आहे.