राज्यात कोरोना महामारीमुळे सगळेच हैराण आहेत. कोरोना रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्यामुळे राज्यातील ठिकठिकाणी आरोग्ययंत्रणेवर ताण पडतो आहे. अनेक ठिकाणी डॉक्टर्स, नर्सेस, तसेच औषधांचा तुटवडा निर्माण झाला आहे. नागपुरात तर ही परिस्थिती जास्त चिंताजनक आहे.
काही दिवसांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूचा विळखा वाढतच चालला आहे. तर महाराष्ट्रातील मुंबई, पुण्यासह नागपूरही कोरोना विषाणूचं हॉटस्पॉट ठरत आहे. या शहरांत दररोज हजारोच्या संख्येनं नवीन कोरोना रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे याचा प्रचंड ताण आरोग्य प्रशासनावर पडत आहे. परिणामी रुग्णांवर उपचार करताना प्रशासनाकडून त्यांची हेळसांड होतं आहे. ऑक्सिजनसोबतचं खाटांची कमतरता प्रशासनाला सतावत आहे. रुग्णालयात बेडची कमतरता असल्यानं दोन कोविड पॉझिटिव्ह रुग्णांना त्याचबरोबर कोविड संशयित रुग्णांनाही एकाच बेडवर उपचार केले जात आहेत.
राज्याची उपराजधानी नागपूरची आरोग्य यंत्रणाही याला अपवाद नाहीये. नागपूरमध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना विषाणूने अक्षरशः हाहाकार उडवला आहे. नागपूरमध्ये दिवसाला तीन हजाराहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद होतं आहे. याचा प्रचंड ताण नागपूर प्रशासनावर पडत आहे. ज्या रुग्णांना कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं आहे. अशा रुग्णांना घरीच उपचार सुरू आहेत. मात्र ज्यांची प्रकृती अस्थिर आहे, अशाच रुग्णांना रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
नागपूरातील शासकीय महाविद्यालयात बेडच्या कमतरतेमुळं कोविड पॉझिटिव्ह आणि संशयित रुग्णांना एकाच बेडवर बसवून उपचार केले जात आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांच्या जीवाशी खेळ केला जात आहे. नागपूरमध्ये बहुतांशी सरकारी रुग्णालयाची हीच स्थिती पाहाता नागरिकांमध्येही चितेंच वातावरण तयार होतं आहे.
देशातही कोरोना विषाणूची स्थिती भयानक बनत चालली आहे. करोनाचे ढग पुन्हा एकदा गडद होताना दिसत आहे. प्रचंड वेगाने वाढणाऱ्या रुग्णसंख्येमुळे महाराष्ट्रासह इतर काही राज्यातील परिस्थिती बिकट झाली असून, देशातील परिस्थिती पुन्हा एकदा चिंताजनक होत असल्याचेच चित्र आहे. देशात गेल्या २४ तासांत (११/४/२१) देशात आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली आहे. देशात १,५२,८७९ जणांना करोनाची लागण झाल्याची समोर आलं आहे. दुसरीकडे करोनामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्याही वाढली असून, कालपर्यंत आठशेपर्यंत मर्यादित असलेली मृतांची संख्या आठशेच्या पार गेली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने २४ तासांत आढळून आलेल्या रुग्णांची आणि मृतांची आकडेवारी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे देशातील सर्वाधिक रुग्णावाढ नोंदवण्यात आली आहे. देशात २४ तासांत १ लाख ५२ हजार ८७९ करोनाबाधित आढळून आले आहेत. तर ९० हजार ५८४ रुग्ण करोनावर मात करून घरी परतले आहेत. चिंतेची बाब देशातील मृतांची संख्याही वाढली आहे. २४ तासांत ८३९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत १ लाख ६९ हजार २७५ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवीन रुग्ण सापडण्याच्या बाबतीत भारताने गेल्या वर्षातील सर्व विक्रम तोडले आहे भारत आता अमेरिकेनंतर जगातला दुसरा देश ठरला आहे, ज्याठिकाणी एका दिवशी कोरोनाचे एक लाखाहून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहे. त्यामुळे आता जागोजागी कडक निर्बंध लादले जात आहे.
त्यातच कोरोना लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने अनेक लसीकरण केंद्र बंद पडले आहेत.लशीं अभावी अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आली आहेत.
महाराष्ट्रात कोरोनाचीपरिस्थिती बिकट होत चालली आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती जर नियंत्रणात आणायची असेल तर लसीकरण महत्त्वाचे आहे. दर महिन्याला १ कोटी ६० लाख लशी केंद्र सरकारने द्याव्यात, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पुन्हा एकदा केली आहे.