राजकारण

चांगलं काम करुनही सरकारवर चिखलफेक; अजित पवारांकडून विरोधकांचा समाचार

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर वक्तव्य केले. विधानपरिषदेत विरोधकांनी कोरोना काळातील, भ्रष्टाचार आणि कोरोना लॉकडाऊनमधील गैरसोय, पेट्रोल डिझेल दरवाढ, आदिवासीसाठी सुरु असलेली खावटी योजना केंद्राकडे असलेला जीएसटी अशा विषयांवर वक्तव्य करुन विरोधकांचे आरोप खोडून काढले आहेत. कोरोना काळात नागरिकांना सर्व सोयी उपलब्ध करुन देण्यात आल्या, कोविड सेंटरची निर्मिती करण्यात आली तसेच राज्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या पेट्रोल-डिझेलच्या आणि घरगुती गॅसच्या किंमतीवरुनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाष्य केलं आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नावर आणि टीकेवर उत्तर देण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे दिसते आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व प्रश्नांवर उत्तर देताना म्हटले की, कोरोना काळात नागरिकांच्या आरोग्याचा विचार करुन कोरोनाशी मुकाबला करण्यासाठी राज्यात सर्व जिल्ह्यात आणि मुंबईत कोविड सेंटर निर्माण करण्यात आले. खासगी रुग्णालयेही ताब्यात घेण्यात आले. मोठ्या प्रमाणात आरोग्यव्यवस्थेची निर्मिती केली. असे करुनही संकट काळाता विरोधकांकडून संशयाच्या नजरेने पाहण्यात आले. उपाययोजना करताना भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला. परंतु भ्रष्टाचार झाला असेल तर त्याचा पुरावा द्या, पुरावा दिल्यावर संबंधितावर तात्काळ कारावई करु असे वक्तव्य अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुढे म्हटले की, कोरोना काळात लॉकडाऊन झाल्यावर जनतेत भीतीचे वातावरण पसरले होते. परंतु मुख्यमंत्री अजित पवार यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. कोरोना काळात अत्यंत वेगाने आणि कठोर निर्णय घेणे भाग पडले त्यामुळे त्या काळात काही अधिकाऱ्यांच्या बदल्याही करण्यात आल्या राजकारणामुळे त्या बदल्या करण्यात आल्या नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरुन केंद्रावर निशाणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी साधला आहे. काँग्रेसचे सरकार असाताना आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रती बॅरल १०० रुपयांपेक्षा जास्त असताना राज्यात पेट्रोल डिझेलचे भाव ७० रुपयांच्या आसपास होते. परंतु आता जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव प्रती बॅरल ६० रुपयांपेक्षा कमी आहे तरी देशात इंधनाचे भाव १०० रुपये लीटरवर पोहोचले आहे. राज्यात आकारण्यात येणाऱ्या इंधनातील निम्म्यापेक्षा जास्त रुपये केंद्राकडे जातात. केंद्राच्या टॅक्स आणि करामुळे राज्यातील पेट्रोल-डिझेलचे भाव जास्त असल्याचे यावेळी अजित पवार यांनी सांगितले आहे. तसेच घरगुती गॅसच्या करात वाढ केल्याने देखील नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

कांदळवने नष्ट करणाऱ्यांवर कारवाई
राज्यातील जनतेला पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवर येणाऱ्या राज्याच्या अर्थसंकल्पात नागरिकांना मोठा दिलासा देणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे. राज्यपालांकडून प्रलंबित असलेल्या १२ आमदारांची नियुक्त्यांवरही भाष्य केले. राज्यपालांनी १२ सदस्यांचा प्रश्न सोडवला असता तर ते १२ सदस्य सभेत उपस्थित राहिले असते त्यांचे प्रश्नही त्यांना मांडले असते. मुंबईतील कांदळवने नष्ट करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे. काही कांदळवने खासगी आहेत तर काही शासकीय आहेत. परंतु कांदळवनामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारावई केली जाईल कोणालाही पाठीशी घालण्यात येणार नाही असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

फडणवीसांवर आक्षेपार्ह लिहिणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर कारवाई करणार
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा संबंध एका तृतीपंथीय व्यक्तीशी असल्याची पोस्ट एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने शेअर केली होती. या पोस्टचा उल्लखे आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी विधासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पटोले यांनी केला. यावेळीस भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सभागृहात आवाज उठवला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर एफआयआर दाखल करून तात्काळ त्याला जेरबंद करण्याची मागणी केली. यालाच प्रत्युत्तर देताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आजच्या आज त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर कारवाई करून अटक केली जाईल असं सांगितलं.

देवेंद्र फडणवीस सभागृहात म्हणाले की, राष्ट्रवादीच्या चिंचवडच्या एका कार्यकर्त्याने ही पोस्ट लिहिली. जर आमच्या पक्षाच्या लोकांनी सरकारविरोधात काही बोललं तरी देखील जेलमध्ये टाकलं जात. पण राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता अशाप्रकारे पोस्ट लिहितो आणि त्याच्या साधी कारवाई केली जात नाही. उद्या अशाप्रकारणे इथे बसलेल्या सगळ्यांविरोधात लिहिणे हे योग्य नाही आहे. जर खरंच सरकारमध्ये नैतिकता असेल तर त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर एफआयआर दाखल करावी आणि त्याला जेलमध्ये टाकलं पाहिजे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ‘राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असो किंवा इतर पक्षाचा कार्यकर्ता असो, त्याने जर चुक केली आहे, तर आजच्या आज त्याच्यावर कारवाई करून अटक केली जाईल.’

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button