राजकारण

जठार यांच्यापाठोपाठ निलेश राणेंचा संजय राऊतांच्या ‘करेक्ट कार्यक्रमा’चा इशारा

सिंधुदुर्ग : भाजप नेते प्रमोद जठार यांनी शिवसेना खा. संजय राऊत आणि विनायक राऊतांवर टीका केली होती. शिवसेनेच्या दोन राऊतांना खूप उत आला आहे. त्यांचा लवकरच कार्यक्रम करू, असा इशारा जठार यांनी दिला होता. जठार यांच्यापाठोपाठ भाजप नेते निलेश राणे यांनीही राऊत यांचा दिसेल तिथे करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचा इशारा दिला आहे.

संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना अजून एखादा करेक्ट कार्यक्रम करू असा इशारा दिला होता. त्यावर पलटवार करताना करेक्ट कार्यक्रम म्हणजे काय? असा सवाल करतानाच संजय राऊत बोगस माणूस आहे. आम्ही जिथं दिसेल तिथं संजय राऊतांचा कार्यक्रम करू, असा इशारा निलेश राणे यांनी दिला.

संजय राऊत आणि राणे पिता-पुत्रांदरम्यान सुरू असलेलं शाब्दिक युद्ध अद्याप थांबलेलं नाही. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही. जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच, असा दावा निलेश राणे यांनी केला. शिवसेनेकडे आचार-विचार राहिले नाहीत केवळ शिवसेना अडवा अडवीची काम करते. आम्ही त्यांना काडीची किंमत देत नाही. संजय राऊत यांनी एकदा आमच्या गर्दीत उभ रहावं आणि मग साहेबांचे विचार काय आहेत ते पहावे असे थेट आव्हानही त्यांनी दिले. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांनी नारायण राणे यांची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता याची पुष्टी देखील त्यांनी केली.

केंद्रीय सुक्ष्म, लघु, उद्योग मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात आली होती. त्यावरूनही निलेश राणे यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं. राणेंना अटक करायला सगळी यंत्रणा कामाला लागली. मात्र काही करू शकले नाहीत. एक दिवस तरी त्यांना ठेवायचं होतं, असं ते म्हणाले.

राणेंच्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. राणेंच स्वास्थ उत्तम आहे. आता लवकरचं विरोधकांचं स्वास्थ्य बिघडवतील. भाजपची यात्रा अडवण्याची धमक कोणामध्ये नाही, असे प्रमोद जठार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button