राजकारण

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात जातीयवादाला खतपाणी : राज ठाकरे

मुंबई : लोकसंख्या वाढीसाठी राजकारणीच जबाबदार आहेत. जोपर्यंत आपण देशाच्या लोकसंख्येवर विचार करत नाही तोपर्यंत हे प्रश्न कधीच सुटणार नाही. राजकीय पक्ष कोणतेही असले तरी काही गोष्टींवर एकमताने विचार करणयाची गरज आहे, असं स्पष्ट मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केलं आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल अभिमान असतो. मात्र दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष हा वाटणं, हे कधी महाराष्ट्रात नव्हतं. हे गेल्या २०-२५ वर्षांपासून सुरु झालं. जातीचा मुद्दा त्यांच्या त्यांच्या नेत्यांच्या ओळखीचा भाग झाला आहे. महाराष्ट्रात जातीचा मुद्दा हा सर्वांथाने मोठा झाला असेल, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जन्मानंतर. कोण जेम्स लेन, कसलं पुस्तक लिहिलं? तो काय जॉर्ज बर्नार्ड शॉ होता. बरं तो आता कोण आहे आणि कुठे आहे? त्या सगळ्या वातावरणात मराठा समाजाच्या मुलांना, मुलींना, हे कोणी लिहिले तर ब्राम्हणांनी लिहिले मग माळी समाज मग इतर समाज हे सगळं रचलेलं आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

महाराष्ट्रामध्ये जाती पहिल्यापासून होत्या. प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल एक अभिमान होता. तसेच जातीवरती मतदानही व्हायचं आणि ते आजही होतं. मला सध्या सध्या महाराष्ट्रामध्ये असं दिसतं की, लोकांना जातीबद्दल अभिमान हा आहेच, पण दूसऱ्याच्या जातीबद्दलचा द्वेष वाढत गेला आहे. हे महाराष्ट्राच्या एकूण सांस्कृतीला डाग लावणार चित्र आहे, असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

देशाच्या विकासात लोकसंख्या एक महत्वाचा अडथळा ठरत असून ती नियंत्रणात आणण्याची गरज असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं. देशातील जनतेला कमी मुलं झाल्यास फायदे देणार आहात सांगत प्रोत्साहन पण द्यावं लागेल असं सांगताना राज ठाकरेंनी याकडे आपण हिंदू, मुस्लिम असं पाहू नये असंही आवाहन केलं. “दारु पिऊन गाडी चालवल्यावर सक्ती करता. जेलमध्ये टाकता किंवा दंड घेता. यामुळे दारु पिऊन गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी झाली. चांगल्या गोष्टींसाठी सक्ती करावी लागते. लोकशाही काही गोष्टींसाठी मारक ठरत असेल तर काही निर्णय घ्यावे लागतील. काही विषयांमध्ये केली नाही तर हे प्रश्न कधीच सुटणार नाही, असं राज ठाकरेंनी यावेळी सांगितलं.

आजही निवडणुकांमध्ये विषय बदललेले नाहीत. आजही चांगले रस्ते, पाणी, वीज, शिक्षण देऊ असं सांगितलं जातं. पण मग आपण नक्की प्रगती कुठून गेली, असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. प्रगती आपण नक्की केली आहे. पण याचा अर्थ रस्ते बांधणं, पूल बांधणं, हातात मोबाइल येणं याला प्रगती मानत नाही. देश म्हणून विचार करताना काही वैचारिक प्रगती झाली का? आपल्या देशात प्रगतीच्या व्याख्या काय आहे, असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button