Top Newsराजकारण

लखीमपूरमधील घटना म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती; शरद पवार संतप्त

भाजपच्या दडपशाहीला देशातील शेतकरी चोख उत्तर देईल !

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी इथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी मोदी सरकारवर हल्लाबोल केला. सत्तेचा गैरवापर करुन दडपशाही शुरु आहे. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असाल तर यश मिळणार नाही, असं म्हणत लखीमपूर घटनेवर शरद पवार संतप्त झाले. शरद पवारांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. लखीमपूरमधील घटना ही जालियनवाला बाग हत्याकांड सारखीच असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपुर खेरीमध्ये शेतकऱ्यांवर भरधाव गाडी घातल्याने ८ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींच्या नेतृत्वात चौकशी व्हावी, अशी मागणी करत पवारांकडून शेतकरी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. उत्तर प्रदेशमधील भाजप सरकारची आणि केंद्र सरकारची दडपशाही असून या दडपशाहीला जनताच उत्तर देईल असे देखील शरद पवार यांनी म्हटलं आहे. युपीमध्ये पंजाब, छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना आडवण्यात आलं हा लोकशाहीच्या मूलभूत अधिकारांची हत्या करण्याचा प्रकार असल्याचे शरद पवार यांनी म्हटलं आहे.

२ राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अडवलं जातं, शेतकरी नेत्यांना रोखलं जात, हा सत्तेचा गैरवापर आहे. देशातील विरोधी पक्ष शेतकऱ्यांसोबत असेल. देशातील जनता सरकारला धडा शिकवेल. शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे, पण भाजपला यात यश मिळणार नाही. देशातला शेतकरी याच केंद्राला उत्तर देईल. केंद्र असो की राज्य सरकार, या घटनेची संपूर्ण दबाबदारी भाजपची आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या न्याय हक्कासाठी लढण्याचा, आंदोलन करण्याचा पूर्ण अधिकार आहे, असं शरद पवार म्हणाले.

देशातील शेतकरी काही मुद्यांवर आंदोलन करत आहेत. केंद्र सरकारविरोधात शांततेत आंदोलन करत आहेत. आता शेतकऱ्यांच्या आंदोलनाला एक वर्ष पूर्ण होत आलं आहे. दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचा एक गट आंदोलन करत आहे. हे आंदोलन शांततापूर्णपणे आंदोलन करण्यात येत आहे. २६ जानेवारीला शेतकऱ्यांनी दिल्लीत येण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यावर यंत्रणेनं तो दडपण्याचा प्रयत्न केला, असं शरद पवार म्हणाले.

लोकशाहीत शांततेत आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. त्याचं अधिकारानं लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. शेतकऱ्यांनी शांततेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी काही लोकांनी विशेषत, भाजप सरकारांमध्ये सत्तेत सहभागी असणाऱ्या लोकांच्या कुटुंबीयांनी शेतकऱ्यांवर गाडी चालवून दूर करण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही शेतकऱ्यांची हत्या झाली, आणखी काही लोकांची हत्या झाली आहे. काही गोष्टी समोर येत आहेत त्यानुसार ६ ते ८ शेतकऱ्यांची जबाबदारी दिल्लीतील केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशातील भाजप सरकारची जबाबदारी आहे, असं शरद पवार म्हणाले.

शेतकऱ्यांवर ज्या प्रकारे हल्ला झाला त्याचा आम्ही निषेध करतो. फक्त निषेध करुन चालणार नाही याची चौकशी झाली पाहिजे. वृत्तपत्रात वाचल्यानुसार उत्तर प्रदेश सरकारनं जबाबदारी घेणार असल्याचं वाचनात आलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या सध्याच्या न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, अशी मागणी शरद पवारांनी केली आहे.

शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की, आम्ही देशभर विरोधी पक्षात काम करणारे लोक शेतकऱ्यांसोबत राहणार आहे. ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांसाठी काम करता येईल ते काम करु, असा विश्वास शरद पवारांनी शेतकऱ्यांना दिला आहे. उत्तर प्रदेशातील सरकार संवेदनाहीन असल्याचं दिसतंय. शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तिथं दु: ख व्यक्त करायला जाणाऱ्यांना अडवलं जातं. इंग्रजांनी जालियानवाला बागेत जी स्थिती निर्माण केली होती. ती स्थिती उत्तर प्रदेशात दिसतेय, असा आरोप पवारांनी केली आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button