मुक्तपीठ

अपेक्षित उचलबांगडी

- भागा वरखडे

गेल्या महिन्याभरात राज्य सरकारची चांगलीच कोंडी होत आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घ्यावा लागला. सचिन वाझे यांच्यावर गुन्हे दाखल करावे लागले. त्यांना निलंबित करावे लागले. त्यानंतर मुंबईचे पोलिस आयुक्त परमवीर सिंह यांची बदली करावी लागली. भाजप त्यावर समाधानी नाही. भाजपला गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा हवा आहे; परंतु त्यांचा राजीनामा न घेता परमवीर सिंह यांचा बळी द्यावा लागला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पोलिस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकपदीही रजनीश सेठ यांना आणण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनानंतर बराच खांदेपालट करण्यात आला आहे. राजकीय खांदेपालट करण्याची शक्यता व्यक्त होत असताना अधिकार्‍यांयाच खांदेपालट झाला.

असे असले, तरी फडणवीस यांनी दिल्ली दरबारी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन वाझे आणि परमवीर सिंह ही छोटी माणसे आहेत, त्यांच्या बोलवित्या धन्याचा शोध घ्यायला हवा, असे सांगून पुढचे लक्ष्य नक्कीच केले आहे. वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावर कोणीही थेट आरोप केला नव्हता, तरी त्यांना बदलण्यात आले. वाझे ठाकरे यांच्या जवळचे अधिकारी मानले जायचे.

त्यांच्या अटकेमुळे पोलिस दलाची प्रतिमा खराब झाली. ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता. वाझे प्रकरणानंतर सरकारला फेस सेव्हिंग करणे गरजेचे होते. पोलिस दलातील एका अधिकार्‍याला स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती.

त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला होता. सरकारला डॅमेज कंट्रोल करणे भाग होते. वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनीच षड्यंत्र रचल्यासारखे दिसून येत होते. महाविकास आघाडी सरकरामध्ये गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. वाझे यांच्या पोलिस दलातील वाढत्या प्रभावामुळे पोलिस दलात नाराजी होती. वरिष्ठ अधिकारी नाराज होते; परंतु पोलिस दलात याची उघडपणे चर्चा केली जात नव्हती. राजकीयदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीवर परमबीर यांनी लक्ष दिले नाही.

त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी होती. पोलिस अधिकार्‍यांना आवरणे सरकारला गरजेचे बनले होतं. त्यामुळे परमबीर यांची बदली झाली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने वाझे यांना अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार स्कॉर्पियोचा पाठलाग करणारी पांढरी इनोव्हा ही वाझे यांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटची होती. अंबानी आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणात वाझे थेट पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर पोलिस दलात परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. एका सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला महत्त्वाची प्रकरणे का दिली जातात?

हा अधिकारी फक्त पोलिस आयुक्तांना थेट रिपोर्ट का करतो? यावरुन पोलिस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. वाझे यांना अटक केल्यानंतर याची प्रत्यक्ष जबाबदारी परमबीर सिंह यांच्यावर येणार याची चिन्ह दिसू लागली होती. पोलिस आयुक्तांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा अधिकारी, पोलिसांची गाडीच एका गुन्ह्यासाठी वापरतो.

आयुक्तांच्या नाकाखाली चाललेल्या गोष्टींची त्यांना माहिती नाही? असे प्रश्‍न परमबीर सिंह यांच्यावर उपस्थित करण्यात येत होते. वाझे यांच्या अटकेनंतर क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या चार अधिकारी कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत परमबीर सिंह यांना पोलिस आयुक्त पदावर कायम ठेवणे योग्य नाही, असा विचार बहुदा सरकारने केला असावा म्हणून त्यांची बदली करण्यात आली असावी. परमबीर सिंह या षड्यंत्राचा भाग नसतीलही. त्यांना याबद्दल काहीच माहिती नसेल; पण ते पोलिस आयुक्त म्हणून आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. आपला ज्युनियर अधिकारी काय करतो, यावर बॉसचे लक्ष असायला हवे.

विरोधकांना शांत करण्यासाठी सरकारने परमबीर यांची बदली केली. वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, परमबीर सिंह यांची बदली करून सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिलेला हा इशारा आहे. परमबीर सिंह यांच्यासारख्या बड्या अधिकार्‍यांची बदली करून राज्य सरकारने एक गोष्ट स्पष्ट केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आपल्या विभागावर लक्ष द्यावे.

पोलिस दलाची प्रतिमेला डाग लावल्यास कारवाई केली जाईल, असा संदेश या बदलीतून दिला गेला आहे. काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या नावाला पहिल्यापासून विरोध होता; पण शिवसेना आणि राष्टृवादी काँग्रेसने हा विरोध न जुमानता सिंह यांना पोलिस आयुक्त केले. वाझे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रश्‍न उपस्थित झाले. देशमुख गृह मंत्रालय सांभाळू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित झाला.

गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नेते पक्षाची प्रतिमा खराब होईल याची भीती होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या बदलीसाठी आग्रह होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या बैठकीत परमबीर सिंह यांना हटवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

पोलिस महासंचालक दर्जाचे आयपीएस अधिकारी हेमंत नगराळे यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला आहे. राज्याच्या पोलिस महासंचालकपदीही रजनीश सेठ यांना आणण्यात आले. विधानसभेच्या अधिवेशनानंतर बराच खांदेपालट करण्यात आला आहे. राजकीय खांदेपालट करण्याची शक्यता व्यक्त होत असताना अधिकार्‍यांयाच खांदेपालट झाला.

असे असले, तरी फडणवीस यांनी दिल्ली दरबारी थेट उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन वाझे आणि परमवीर सिंह ही छोटी माणसे आहेत, त्यांच्या बोलवित्या धन्याचा शोध घ्यायला हवा, असे सांगून पुढचे लक्ष्य नक्कीच केले आहे. वाझे यांना मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटक झाली. या प्रकरणात परमबीर सिंह यांच्यावर कोणीही थेट आरोप केला नव्हता, तरी त्यांना बदलण्यात आले. वाझे ठाकरे यांच्या जवळचे अधिकारी मानले जायचे.

त्यांच्या अटकेमुळे पोलिस दलाची प्रतिमा खराब झाली. ठाकरे सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता. वाझे प्रकरणानंतर सरकारला फेस सेव्हिंग करणे गरजेचे होते. पोलिस दलातील एका अधिकार्‍याला स्फोटके ठेवल्याप्रकरणी अटक झाली होती.

त्यामुळे सरकारच्या प्रतिमेला तडा गेला होता. सरकारला डॅमेज कंट्रोल करणे भाग होते. वाझे यांना अटक झाल्यानंतर पोलिसांनीच षड्यंत्र रचल्यासारखे दिसून येत होते. महाविकास आघाडी सरकरामध्ये गृह मंत्रालय राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.

परमबीर सिंह यांच्याविरोधात अनेक तक्रारी सरकारकडे आल्या होत्या. वाझे यांच्या पोलिस दलातील वाढत्या प्रभावामुळे पोलिस दलात नाराजी होती. वरिष्ठ अधिकारी नाराज होते; परंतु पोलिस दलात याची उघडपणे चर्चा केली जात नव्हती. राजकीयदृष्ट्या अतिमहत्त्वाच्या प्रकरणांच्या चौकशीवर परमबीर यांनी लक्ष दिले नाही.

त्यामुळे त्यांच्याबद्दल नाराजी होती. पोलिस अधिकार्‍यांना आवरणे सरकारला गरजेचे बनले होतं. त्यामुळे परमबीर यांची बदली झाली. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली गाडी ठेवल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने वाझे यांना अटक केली.

सूत्रांच्या माहितीनुसार स्कॉर्पियोचा पाठलाग करणारी पांढरी इनोव्हा ही वाझे यांच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटची होती. अंबानी आणि इतर महत्त्वाच्या प्रकरणात वाझे थेट पोलिस आयुक्त म्हणून परमबीर सिंह यांना रिपोर्ट करायचे. त्यामुळे वाझे यांच्या अटकेनंतर पोलिस दलात परमबीर सिंह यांच्या भूमिकेवर दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. एका सहायक पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍याला महत्त्वाची प्रकरणे का दिली जातात?

हा अधिकारी फक्त पोलिस आयुक्तांना थेट रिपोर्ट का करतो? यावरुन पोलिस दलात दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली होती. वाझे यांना अटक केल्यानंतर याची प्रत्यक्ष जबाबदारी परमबीर सिंह यांच्यावर येणार याची चिन्ह दिसू लागली होती. पोलिस आयुक्तांना प्रत्येक गोष्टीची माहिती देणारा अधिकारी, पोलिसांची गाडीच एका गुन्ह्यासाठी वापरतो.

आयुक्तांच्या नाकाखाली चाललेल्या गोष्टींची त्यांना माहिती नाही? असे प्रश्‍न परमबीर सिंह यांच्यावर उपस्थित करण्यात येत होते. वाझे यांच्या अटकेनंतर क्राइम इंटेलिजन्स युनिटच्या चार अधिकारी कर्मचार्‍यांची चौकशी करण्यात आली. या प्रकरणात मुंबई पोलिसातील वरिष्ठ अधिकार्‍यांची चौकशी होण्याची शक्यता आहे.

अशा परिस्थितीत परमबीर सिंह यांना पोलिस आयुक्त पदावर कायम ठेवणे योग्य नाही, असा विचार बहुदा सरकारने केला असावा म्हणून त्यांची बदली करण्यात आली असावी. परमबीर सिंह या षड्यंत्राचा भाग नसतीलही. त्यांना याबद्दल काहीच माहिती नसेल; पण ते पोलिस आयुक्त म्हणून आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाहीत. आपला ज्युनियर अधिकारी काय करतो, यावर बॉसचे लक्ष असायला हवे.

विरोधकांना शांत करण्यासाठी सरकारने परमबीर यांची बदली केली. वरिष्ठ राजकीय पत्रकार सुधीर सूर्यवंशी म्हणतात, परमबीर सिंह यांची बदली करून सरकारने वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना दिलेला हा इशारा आहे. परमबीर सिंह यांच्यासारख्या बड्या अधिकार्‍यांची बदली करून राज्य सरकारने एक गोष्ट स्पष्ट केली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी आपल्या विभागावर लक्ष द्यावे.

पोलिस दलाची प्रतिमेला डाग लावल्यास कारवाई केली जाईल, असा संदेश या बदलीतून दिला गेला आहे. काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या नावाला पहिल्यापासून विरोध होता; पण शिवसेना आणि राष्टृवादी काँग्रेसने हा विरोध न जुमानता सिंह यांना पोलिस आयुक्त केले. वाझे प्रकरण योग्य पद्धतीने हाताळले गेले नाही म्हणून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर प्रश्‍न उपस्थित झाले. देशमुख गृह मंत्रालय सांभाळू शकत नाहीत, असा सवाल उपस्थित झाला. गृहखाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे नेते पक्षाची प्रतिमा खराब होईल याची भीती होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा परमबीर सिंह यांच्या बदलीसाठी आग्रह होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button