Top Newsतंत्रज्ञान

मराठमोळे अतुल राणे ब्रह्मोस एअरोस्पेसचे नवे प्रमुख

नवी दिल्ली : डीआरडीओचे शास्त्रज्ञ अतुल राणे यांनी ब्रम्होस एअरोस्पेस लिमिटेडच्या सीईओ आणि एमडी पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला. या निमित्तानं महाराष्ट्रातील एका व्यक्तीकडं महत्त्वाची जबाबदारी आली आहे. ब्रह्मोस एअरोस्पेस लिमिटेड ही कंपनी सुपरसोनिक क्रुझ मिसाईल बनवते.

अतुल राणे हे मिशन क्रिटिकल ऑनबोर्ड कॉम्पुटरचं स्वदेशी डिझाईन बनवणे आणि विकसित करणे, लूप सिम्युलेशन स्टडीज मध्ये हार्डवेअर, सिस्टीम अ‍ॅनालिसीस, मिशन सॉफ्टवेअरच्या विकास आणि डिफेन्स अ‍ॅप्लिकेशनच्या एवियोनिक्स तंत्रज्ञानामध्ये १९८७ पासून योगदान देत आहेत.

अतुल राणे यांनी चेन्नईच्या गुइन्डी इंजिनीरिंग कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलं. त्यानंतर त्यांनी पदव्युत्तर शिक्षण पुण्यातून पूर्ण केलं. १९८७ मध्ये ते डीआरडीओमध्ये दाखल झाले. अतुल राणे यांनी त्यांची कारकीर्द डीआरडीओच्या प्रयोगशाळेतून केली होती. त्यानंतर त्यांनी भारतात विकसत होत असलेल्या जमिनीवरुन हवेत मारा करणाऱ्या आकाश मिसाईल यंत्रणेतील मॉड्युलर रिअल टाईम सिम्युलेशन परिक्षण तंत्र विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. यानंतर त्यांनी ऑनबोर्ड कॉम्प्युटर डिव्हिजनमध्ये अग्नि-१ मिसाईल बवण्यासाठी नेमण्यात आलेल्या ऑनबोर्ड मिशन सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट प्रोग्रामचं नेतृत्त्व केलं.

अतुल राणे रशिया सोबतच्या ब्रह्मोस निर्मितीच्या पहिल्यापासून कार्यरत असणाऱ्या टीममध्ये कार्यरत आहेत. ब्रह्मोस टीमच्या सुरुवातीपासूनच्या कोअर टीमचे सदस्य आहेत. अतुल राणे हे मुळचे महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील असून रावेर तालुक्यातील सावदा हे त्यांचं मूळगाव आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button