राजकारण

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांच्या चर्चेवर काँग्रेसचा बहिष्कार

नवी दिल्ली: पाचही राज्यांच्या निवडणुकांचा निकाल आज रविवारी (२ मे) लागणार आहे. पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकांसाठी आज मतमोजणी होणार आहे. तसेच या निवडणुकांमध्ये कोण गुलाल उधळणार याकडेच राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. त्यामुळे अनेक प्रसिद्धी माध्यमांवर या निवडणुकांचीही धामधूम असणार आहे.

विशेष म्हणजे देशातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रवक्ते आणि नेत्यांनी कोणत्याही डिबेट शोमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय घेतलाय. काँग्रेस अध्यक्षांनीच तशा सूचना सर्व प्रवक्त्यांना दिल्यात. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय. प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या अध्यक्षांच्या मतानुसार, पाच राज्यांतील किंवा पश्चिम बंगाल निवडणुकीतील कोणत्याही चर्चेत आम्ही सहभागी होणार नाही, असा आदेशच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी दिलाय. काँग्रेस नेते अतुल लोंढे पाटील यांनी ट्विट करत ही माहिती दिलीय.
देश अभूतपूर्व संकटाचा सामना करत आहे, पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात असलेली सरकारं कोसळलीत, तेव्हा देशाच्या अशा परिस्थितीला ते जबाबदार असून, आम्ही निवडणुकीतील जय आणि पराभव यावर चर्चा करणार नाही. अखिल भारतीय काँग्रेस समितीने निवडणुकांच्या चर्चेतून काँग्रेसच्या प्रवक्त्यांना कोणत्याही चर्चेत सहभागी न होण्यास सांगितले आहे. मीडियाला हवे असलेल्या कोणत्याही टिप्पणीसाठी आम्ही उपलब्ध राहू. आपण जिंकू, आम्ही हरवू, पण अशा वेळी जेव्हा लोक ऑक्सिजन, बेड, औषधे, वेंटिलेटर शोधत आहेत; आमचे कर्तव्य त्यांच्या पाठीशी उभे राहण्यात आहे, ते बरे होण्यासाठी आणि त्यांच्या मदतीसाठी कार्य करण्यास आम्हाला आमचं कर्तव्य सांगत आहेत. आमची भारताशी एकता आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

पश्चिम बंगाल, केरळ, आसाम, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. त्यामुळे कोण विजयी होणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या एकूण २९४ जागा आहेत. आसाममध्ये एकूण १२६ जागा आहेत. केरळमध्ये १४०, तामिळनाडूत २३४ आणि पुद्दुचेरीत ३० जागा आहेत. या सर्व जागांसाठी रविवारी मतमोजणी होत आहे. त्यामुळे या पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या निवडणुकीत काँग्रेसने आसामसह केरळवर सर्वाधिक लक्ष केंद्रीत केलं होतं. तर भाजप आणि तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालवर सर्वाधिक फोकस केला होता. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये तळ ठोकून होते. त्यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष पश्चिम बंगालकडे लागलं असून बंगालमध्ये काय होणार? याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button