Top Newsराजकारण

घंटानाद करा, पण आमचा नाद करू नका; शिवसेनेचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अद्यापही ठाकरे सरकारने मंदिरे न उघडण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंदिरे उघडली नाहीत, तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे म्हटले आहे. यावर, घंटानाद करा, आणखी काही करा. पण आमचा नाद करू नका, असा टोला शिवसेनेकडून लगावण्यात आला आहे.

राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत घेत ठाकरे सरकावर जोरदार टीका केली. लॅाकडाऊन आवडे सरकारला अशी परिस्थिती आहे. सर्व गोष्टी सुरू आहेत, मात्र दुसरी, तिसरी लाट सांगत घाबरवले जात आहे. सर्व गोष्टी सुरु असतात मग सणांवरच का येता? तसेच मंदिरे उघडली नाहीत तर मनसे घंटानाद आंदोलन करणार असल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. यावर मुंबईच्या महापौर आणि शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी पलटवार करत राज ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

घंटानाद करा, नायतर आणखी कसला नाद करा, आमचा नाद करू नका. राजकीय पोळ्या भाजून घेणारे आम्ही लोकांच्या भावनेचा विचार करतो, असे दाखवतात. मात्र, भावनेचा नाही तर लोकांच्या जीवाचा विचार करायला हवा. जेव्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो, तेव्हा हे सगळे बीळात जाऊन लपतात, असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला.

दरम्यान, मुंबई महापालिकेची तिसऱ्या कोरोना लाटेचा संभाव्य धोका गृहित धरून सर्व तयारी केली आहे. विशेषत: सील इमारती आणि नो मास्क मोहिमेवर आमचे लक्ष असेल. मास्क न घातलेल्यांवर कारवाई तीव्र होणारच आहे. मात्र, हुज्जत घालणाऱ्या, अरेरावी करणाऱ्या क्लीनअप मार्शलविरोधात नागरिकांच्या तक्रारी आल्यास अशा क्लीनअप मार्शलवरही कारवाई होणार आहे, असे किशोरी पेडणेकर यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button