
मुंबई : कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हाबंदीची दिलेली नोटीस आणि किरीट सोमय्यांच्या घराबाहेर तैनात करण्यात आलेला शेकडो पोलिसांचा बंदोबस्त यामुळे अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध असा वाद पेटला. राज्य सरकारकडून किरीट सोमय्या यांच्याविरोधात करणात येत असलेल्या कारवाईबाबत भाजपाच्या गोटातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांवर आता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी बोचरी टीका केली आहे. दिल्लीत मुजरा करू देत नाहीत म्हणून सोमय्यांचा गल्लीत गोंधळ सुरू आहे. ही नौटंकी मनोरंजक आहे, असा टोला सचिन सावंत यांनी लगावला आहे.
याबाबत केलेल्या ट्विटमध्ये सचिन सावंत म्हणाले की, किरीट सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी ते गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा, असा सल्लाही सावंत यांनी किरीट सोमय्या यांना दिला.
सोमय्यांना दिल्लीतील भाजपा नेते मुजरा करायला देत नाहीत म्हणून लक्ष वेधण्यासाठी गल्लीत गोंधळ घालत आहेत. ही नौटंकी मनोरंजक आहे, उगीच कोण फुकटचे मनोरंजन बंद करेल? कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांच्या जिल्हाबंदीच्या आदेशामुळे पोलिसांनी नोटीस दिली आहे. तमाशा करायचा तो कायद्याच्या चौकटीत करा https://t.co/bNoK7NebIg
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) September 19, 2021




