अॅमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरू
मुंबई : जर तुम्हाला नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा असेल तर २२ मार्चपासून ई-कॉमर्स साइट अमेझॉनवर ग्राहकांसाठी एक खास सेल अॅमेझॉन फॅब फोन्स फेस्ट सेल सुरू झाला आहे. चार दिवस चालणारा Amazon Sale २५ मार्चपर्यंत चालणार आहे. ग्राहकांना यात Samsung, Xiaomi, Apple iPhone, Vivo आणि Realme सारख्या स्मार्टफोनला स्वस्त किंमतीत खरेदी करता येऊ शकते.
अमेझॉन पेज नुसार, ग्राहकांना या सेल दरम्यान, स्मार्टफोन्सवर ४० टक्के सूट सोबत खरेदी करता येऊ शकते. तसेच ग्राहकांना विना व्याज ईएमआयची सुविधा, एक्सचेंज आणि बँक ऑफर्स मिळणार आहे. अॅमेझॉनने या सेल दरम्यान स्मार्टफोन्सवर मिळणारी डिल्सवरून पडदा हटवला नाही. परंतु, सेल पेजवरून संभावित किंमतीचे संकेत मिळत आहे. उदाहरणासाठी Redmi 9A स्मार्टफोन डिस्काउंट नंतर ७ हजार रुपयांपेक्षा कमीत कमी विक्रीसाठी उपलब्ध केले जाणार आहे. सूट नंतर रेडमी ९ प्राइम सुरुवातीच्या किंमतीत विकली जाणार आहे. डिस्काउंट नंतर फोनची किमत १० हजार रुपयांपेक्षा कमी होणार आहे.