Top Newsस्पोर्ट्स

बजरंग पुनियाला कांस्यपदक, कझाकिस्तानच्या पैलवानावर ८-० ने मात

टोक्यो : भारताचा पैलवान बजरंग पुनियाने कझाकिस्तानच्या नियाझबेकोवर सुरुवातीपासून आघाडी घेतली. त्याने आपले एक एक डाव टाकत २ पॉईंट घेतले. ६५ किलो वजनी गटात कांस्यपदकाची लढाई सुरु असताना, पुनियाने आपली आगेकचू कायम ठेवली. दोन पॉईंटची आघाडी असताना, त्याने आणखी एक डाव टाकून २ पॉईंट घेतले. मग त्याने आक्रमक पवित्रा घेत आणखी २ पॉईंट घेऊन, आपली आघाडी ६-० अशी केली. अखेर बजरंग पुनियानं मॅच ८-० अशी जिंकत भारताला कांस्य पदक मिळवून दिलं.

बजरंगला ६५ किलो वजनी गटातील कांस्यपदकाच्या लढतीत कझाकिस्तानच्या डौलेट नियाझबेकोव्हकडून कडवी टक्कर मिळाली. संपूर्ण स्पर्धेत बचावात्मक खेळ करणारा बजरंग आज आक्रमक पवित्र्यात दिसला आणि त्या जोरावर त्यानं कांस्यपदक नावावर केले.

कांस्यपदकाच्या लढतीतही बजरंगनं सावध सुरुवातीवरच भर दिला. पहिल्या मिनिटांत प्रतिस्पर्धी खेळाडूची ताकद आजमावल्यानंतर बजरंगनं काहीसा आक्रमक खेळ केला. त्यानं ३० सेकंदाच्या पेनल्टी कालावधीत एक गुणांची आघाडी घेतली. त्यानंतर नियाझबेकोव्हनं त्याची पकड करण्याचा प्रयत्न केला, परंतु बजरंगनं यश मिळवत त्याची पकड सैल केली. पहिल्या तीन मिनिटांत बजरंगनं २-० अशी आघाडी घेतली. बजरंग मुलं आक्रमक पवित्र्यात परतला अन् सातत्यानं कझाकिस्तानच्या खेळाडूवर दडपण निर्माण केले. बजरंगनं अँकल पकड करताना खात्यात आणखी दोन गुण जमा केले अन् आघाडी ४-० अशी भक्कम केली. बजरंगनं काऊंटर अटॅक करताना पुन्हा दोन गुण घेतले. बजरंगला ८-० असा सामना जिंकला. उपांत्य फेरीत बजरंगला २०१६च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेतील ( ५७ किलो वजनी गट) कांस्यपदक विजेत्या अझरबैजानच्या आलीयेव्ह हाजीने पराभूत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button