मनोरंजन

अभिनेता एजाज खान एनसीबीच्या ताब्यात

मुंबई : बॉलिवूड ड्रग केसमध्ये एनसीबीने अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं आहे. ड्रग केसमध्ये ड्रग पेडलर शादाब बटाटाला अटक केल्यानंतर आता अभिनेता एजाज खानचं नाव समोर आलं होतं. आज एजाज खान राजस्थानहून मुंबईत दाखल झाला. त्यानंतर एनसीबीने त्याला ताब्यात घेतलं आहे. एजाज खानही बटाटा गँगचाच एक भाग आहे, असा आरोप लावण्यात आला आहे. एनसीबीचं पथक एजाजच्या अंधेरी आणि लोखंडवाला यांसारख्या अनेक ठिकाणी छापेमारी केली असून अद्यापही एनसीबीची कारवाई सुरु आहे.

एनसीबीने मुंबईतील सर्वात मोठा ड्रग सप्लायर फारूख बटाटाचा मुलगा शादाब बटाटाला काही दिवसांपूर्वी अटक केली होती. जवळपास 2 कोटी रुपयांचे ड्रग्ज त्याच्याकडून ताब्यात घेण्यात आले होते. शादाब बटाटावर मुंबईतील बॉलिवूड सेलिब्रिटींना ड्रग्स पुरवण्याचा आरोप आहे. फारूख पूर्वी बटाटे विकत होता. त्यावेळी तो अंडरवर्ल्डच्या काही लोकांच्या संपर्कात आला आणि सध्या तो मुंबईतील सर्वात मोठा ड्रग्स सप्लायर म्हणून ओळखला जातो. ड्रग्जच्या या जाळ्यातील सर्व कामं सध्या त्याची दोन्ही मुलं पाहतात.

बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शन संबंधी तपास करणाऱ्या NCB ने अभिनेता अर्जुन रामपालची चौकशी सुरु केली होती. या दरम्यान NCB अशी शंका होती की अर्जुन रामपाल दक्षिण आफ्रिकेला पळून जाण्याची शक्यता आहे. म्हणून तशा आशयाचे एक पत्रही NCB ने दक्षिण आफ्रिकेच्या काऊन्सलेट जनरलला लिहिले होते. NCB च्या चार्जशीटमधून हा खुलासा झाला आहे.

अर्जुन रामपालच्या घरी छापेमारी केल्यानंतर त्याच्या घरातून काही गोळ्या आणि इतर सामान NCB ने जप्त केलं होतं. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली होती. या दरम्यान, अर्जुन रामपाल भारत सोडून दक्षिण आफ्रिकेला पसार होण्याची शक्यता NCB ला होती. NCB बॉलिवूडचे ड्रग्ज कनेक्शनचा तपास करत असून अजूनही अर्जुन NCB च्या रडारवर आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button