महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे २०० रुग्ण; ८ जणांचा मृत्यू

मुंबई : महाराष्ट्रात म्युकरमायकोसिसचे २०० रुग्ण आढळले असून ८ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनातून बरे झालेल्यांना म्युकरमायकोसिस हा बुर्शीजन्य गंभीर आजार होत आहे. गुजरातमध्ये ५०० कोरोना रुग्णांना म्युकरमायकोसिसमुळे २० जणांचे डोळे निकामी झाले, तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या आजाराचे रुग्ण आता महाराष्ट्रात देखील आढळू लागल्याने चिंता वाढली आहे.
देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. तसंच कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांना विविध आजार होत असताना आता म्युकरमायकोसिस हा बुर्शीजन्य गंभीर आजार समोर आला आहे. हे रुग्ण आधी महाराष्ट्राबाहेर आढळले होते. दरम्यान, आता महाराष्ट्रात देखील या आजाराचे रुग्ण आढळले आहेत. ज्यांना मधूमेह आहे आणि कोरोना होऊन गेला, त्यांना या आजाराचा जास्त धोका आहे. अनियंत्रित मधुमेहींमध्ये शरीरातील साखरेची पातळी कमी होते. यामध्ये अॅसिडची पातळीही कमी होते. ही स्थिती बुरशीच्या वाढीसाठी पोषक असते. त्यामुळे अशा रुग्णांमध्ये ‘म्युकरमायकोसिस’ हा बुरशीजन्य संसर्ग आढळतो.
म्युकरमायकोसिसची लक्षणे : म्युकरमायकोसिस झाल्यास चेहऱ्यावर वेदना होतात तसंच डोकं दुखतं. डोळ्यांच्या आजुबाजूचा भाग सुजतो व तेथे वेदना होतात. गालांवर सूज येते. चावताना दात दुखतात.




