मुक्तपीठसाहित्य-कला
ठाणे महापालिकेत स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उपायुक्त दीपक झिंजाड, प्र. उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, माहिती व जनसंपर्क विभागाचे विकास मोरे यांच्यासह सुरक्षारक्षक व विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तद्नंतर राम गणेश गडकरी रंगायतन येथील स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे स्मृतीस्तंभास उपायुक्त दीपक झिंजाड व रंगायतन व्यवस्थापक भारत गादेगांवकर यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

—





