Uncategorized

वन डे मालिका : पहिल्या सामन्यात भारताचा विंडीजवर ६ गडी राखून विजय

अहमदाबाद : भारतीय संघाने पहिल्या वन डे सामन्यात दणदणीत विजय मिळवताना वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर व प्रसिद्ध कृष्णा यांच्या उल्लेखनीय कामगिरीनंतर कर्णधार रोहित शर्माने अर्धशतकी खेळी करून संघाला विजय मिळवून दिला. फुल टाईम वन डे कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात रोहितने नेतृत्व गुणाची झलक दाखवली. त्याने घेतलेले डीआरएस यशस्वी ठरले, विराट कोहलीच्या मदतीनं त्यानं सुरेख क्षेत्ररक्षण लावले आणि गोलंदाजांचा योग्य वापर केला. भारताने या ऐतिहासिक १००० व्या सामन्यात मोठा विजय मिळवला.

सूर्यकुमार यादव (३४) आणि दीपक हुड्डा (२६) या जोडीने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. भारताने सहज विजय मिळवला असं दिसतं असलं तरी, मध्ये गडबड झाली होती. रोहित शर्मा बाद (६०) झाल्यानंतर विराट (८), इशान किशन (२८) आणि ऋषभ पंत (११) ठराविक धावांच्या अंतराने बाद झाले. बिनबाद ८४ अशा स्थितीमध्ये असलेल्या भारताची ४ बाद ११६ अशी स्थिती झाली होती. पण त्यावेळी सूर्यकुमार यादव आणि दीपक हुड्डाने डाव सावरला व भारताला विजय लक्ष्यापर्यंत पोहोचवले. पहिलाच सामना खेळणाऱ्या दीपक हुड्डाने चांगली फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि इशान किशनने भारताला चांगली सुरुवात करुन दिली.

रोहित शर्माने कर्णधारपदाला साजेसा खेळ दाखवला. त्याने ५१ चेंडूत ६० धावांची खेळी करताना दहा चौकार आणि एक षटकार लगावला. दक्षिण आफ्रिकेतील वनडे सीरीजप्रमाणे येथेही चांगल्या भागादारीनंतर एक विकेट गेल्यानंतर पुन्हा डाव गडगडल्याचे दिसून आले. यावेळी लक्ष्य छोटं असल्यामुळे अडचण आली नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व इशान किशन यांनी टीम इंडियाला दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ८४ धावांची भागीदारी केली. रोहितने ५१ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ६० धावा केल्या. त्यानंतर आलेला विराट कोहली २ चौकार मारून माघारी परतला, परंतु मोठा पराक्रम नोंदवून गेला. अल्झारी जोसेफने एका षटकात या दोघांनाही बाद केले.

इशान किशनला ( २८) अकिला होसैनने बाद केले, तर रिषभ पंत ( ११) दुर्दैवीरित्या बाद झाला. सूर्यकुमारने मारलेला सरळ फटका अडवण्यासाठी गोलंदाज जोसेफने पाय लावला आणि चेंडू नॉन स्ट्रायकर एंडच्या स्टम्प्सवर आदळला. क्रीज सोडलेल्या रिषभला काहीच करता आले नाही आणि तो धावबाद झाला. पदार्पणवीर दीपक हुडा आणि सूर्यकुमार यादव यांनी संयमी खेळ करताना भारताचा विजय पक्का केला. हुडा २६, तर सूर्यकुमार ३४ धावांवर नाबाद राहिला. भारताने २८ षटकांत ४ बाद १७८ धावा करून विजय पक्का केला.

दरम्यान गोलंदाजांनी भारताच्या विजयाचा पाया रचला. युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांची फिरकी गोलंदाजी खेळणं वेस्ट इंडिजला झेपलचं नाही. आधी मोहम्मद सिराजने भारताला पहिलं यश मिळवून दिलं. सलग दोन चौकार लगावल्यानंतर शाई होपला सिराजने बोल्ड केलं. चेंडू बॅटला लागून स्टंम्पवर आदळला. होप व्यक्तीगत आठ धावांवर आऊट झाला. ब्रँडन किंग-डॅरेन ब्राव्होची जोडी जमणार असं वाटत असतानाच भारताचा फिरकी गोलंदाज वॉशिंग्टन सुंदरने वेस्ट इंडिजला एकाच षटकात दोन धक्के दिले. त्याने सलामीवर ब्रँडन किंगला १३ धावांवर सूर्यकुमार यादवकरवी झेलबाद केले. त्याच षटकात ब्राव्होला १८ धावांवर पायचीत पकडलं. यासाठी डीआरएस सिस्टिमचा आधार घेतला.

शामार्त ब्रूक्स आणि निकोलस पूरन यांची जोडी जमणार असं वाटत असतानाच युजवेंद्र चहलने ही जोडी फोडली. चहलने १८ धावांवर खेळणाऱ्या पूरनला पायचीत पकडलं. निकोलस पूरन पाठोपाठ वेस्ट इंडिजचा धोकादायक फलंदाज कॅप्टन कायरन पोलार्डला युजवेंद्र चहलने तंबूचा रस्ता दाखवला आहे. चहलने पोलार्डला भोपळाही फोडू न देताना क्लीन बोल्ड केलं. ब्रँडन किंग (१३) व डॅरेन ब्राव्हो (१८) यांनी विंडिजचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. वॉशिंग्टन सुंदरने एकाच षटकात या दोघांनाही बाद केले. त्यानंतर युझवेंद्र चहलने सलग दोन चेंडूंवर निकोलस पूरन (१८) व कर्णधार किरॉन पोलार्ड (० ) यांची विकेट घेतली, पण तो हॅटट्रिक घेण्यापासून चुकला. ७ बाद ७९ अशा अवस्थेत सापडलेल्या विंडीजसाठी जेसन होल्डर व फॅबियन अ‍ॅलन ही जोडी धावून आली. या दोघांनी ८ व्या विकेटसाठी ७८ धावांची भागीदारी केली. वॉशिंग्टन सुंदरने ही भागीदारी तोडताना फॅबियनला २९ धावांवर बाद केले. होल्डर ७१ चेंडूंत ४ षटकारांसह ५७ धावांवर प्रसिद्ध कृष्णाच्या गोलंदाजीवर बाद झाला. वेस्ट इंडिजचा संघ ४३.५ षटकांत १७६ धावांवर तंबूत परतला. चहलने ४ तर सुंदरने ३ विकेट घेतल्या. दोघांनी मिळून वेस्ट इंडिजच्या सात फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. तिथेच वेस्ट इंडिजचा संघ बॅकफूटवर ढकलला गेला होता.

८ धावांवर बाद होऊनही विराट कोहलीचा मोठा पराक्रम

विराट कोहली दोन चौकार मारून माघारी परतला, परंतु मोठा पराक्रम नोंदवून गेला अल्झार जोसेफने एका षटकात या दोघांनाही बाद केले. रोहितने ५१ चेंडूंत १० चौकार व १ षटकार खेचून ६० धावा केल्या. वेस्ट इंडिजविरुद्ध हे त्याचे वन डे तील १०वे अर्धशतक ठरले आणि या विक्रमात विराट ( ११ ) ५०+ धावांसह आघाडीवर आहे. सचिन तेंडुलकर (७), राहुल द्रविड (६) व सौरव गांगुली (५) यांचा विक्रम त्यांनी मोडला. वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करण्याच्या विक्रमात रोहितने आज वीरूला मागे टाकले. रोहितच्या नावावर ७२९८ धावा आहेत आणि त्याने वीरूच्या ७२४० धावांना मागे टाकले. सचिन तेंडुलकर (१५३१० ) आणि सौरव गांगुली (९१४६) आघाडीवर आहेत.

घरच्या मैदानावर वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये विराटने दुसरे स्थान पटकावले आहे. सचिन तेंडुलकर ६९७६ धावांसह अव्वल क्रमांकावर आहे, त्यापाठोपाठ विराटचा ५००२ धावांसह क्रमांक येतो. महेंद्रसिंग धोनी ( ४३५१) व रोहित शर्मा ( ३६७८) हे अव्वल चारमध्ये आहेत. विराटने घरच्या मैदानावर सर्वात जलद ९६ डावांमध्ये ५००० + धावांचा विक्रम आज नावावर केला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button