टाटा मोटर्सची प्रमुख एसयूव्ही सफारीचा #DARK श्रेणीमध्ये समावेश

मुंबई : टाटा मोटर्स या भारताच्या आघाडीच्या ऑटोमोटिव्ह ब्रॅण्डने कंपनीच्या यशस्वी #DARK श्रेणीमध्ये नवीन प्रमुख भर सफारी #DARK च्या लॉन्चची घोषणा केली. सफारी #DARK एडिशनसाठी बुकिंग्ज आता सुरू आहे आणि INR 19.05 लाख रूपये (एक्स-शोरूम, दिल्ली) या किंमतीमध्ये देशभरातील डिलरशिप्समध्ये उपलब्ध आहे.
सफारी #DARK सिग्नेचर ओबेरॉन ब्लॅक एक्स्टीरिअर बॉडी कलरमध्ये येईल. अनेकजण आता #DARK श्रेणीशी संलग्न झाले आहेत. फेण्डर व टेलगेटवरील मास्कट्स तसेच १८ इंच ब्लॅकस्टोन अलॉई व्हील्स एक्स्टीरिअरला सिग्नेचर #DARK लुक देतात. इंटीरिअर्ससंदर्भात सफारी #DARK मध्ये प्रिमिअम ब्लॅकस्टोन डार्क थीमसह प्रमुख घटकांमधील विशेष बदलांचा समावेश आहे. वैशिष्ट्यपूर्ण डार्क फिनिशसोबत स्पेशल ब्लॅकस्टोन मॅट्रिक्स डॅशबोर्ड आणि प्रिमिअम डार्क अपहोल्स्टरी (नेप्पा ग्रॅनाईट ब्लॅक कलर स्किमसह ब्ल्यू ट्राय अॅरो परफोरेशन्स व ब्ल्यू स्टिचिंग) सफारी #DARK च्या इंटीरिअर्सना आकर्षक लुक देतात.

एक्सटी+/एक्सटीए+ आणि एक्सझेड+/एक्सझेडए+ ट्रिम्समध्ये उपलब्ध सफारी #DARK मध्ये इतर विशेष वैशिष्ट्यांची भर करण्यात – जसे पहिल्या व दुस-या रांगेमध्ये वेण्टिलेटेड सीट्स, एअर प्युरिफायर आणि वाय-फायवर अँड्रॉईड ऑटो व अॅप्पल कार प्ले.
या लॉन्चबाबत बोलताना टाटा मोटर्सच्या पॅसेंजर वेईकल विक्री, विपणन व ग्राहक सेवेचे उपाध्यक्ष राजन अंबा म्हणाले, गेल्या वर्षी जुलैमध्ये लॉन्च करण्यात आलेली पॉवर-पॅक श्रेणी – भारताची सर्वात सुरक्षित प्रिमिअम हॅचबॅक ‘अल्ट्रोज’, भारताची पहिली जीएनसीएपी ५-स्टार प्रमाणित कार ‘नेक्सॉन’, लॅण्ड रोव्हर खासियतने युक्त टाटा मोटर्सची प्रिमिअम मध्यम आकाराची एसयूव्ही ‘हॅरियर’ आणि भारताची सर्वोच्च विक्री होणारी प्रवासी इलेक्ट्रिक कार ‘नेक्सॉन ईव्ही’सह #DARK श्रेणी अल्पावधीतच प्रवासी वाहनांच्या आमच्या न्यू फॉरेव्हर श्रेणीची प्रमुख बनली आहे. लाइन-अपमध्ये ग्राहकांना देण्यात येणा-या उत्साहवर्धक व अद्वितीय तत्त्वाने युक्त सफारी #DARK च्या भरसह यामध्ये अधिक वाढ करण्यात येईल.
ब्रॅण्ड्समधील उच्च विक्रीसह #DARK श्रेणी निश्चितच ग्राहकांमध्ये लोकप्रिय ठरली आहे. सुरुवातीला लिमिटेड एडिशन उत्पादन म्हणून लॉन्च करण्यात आलेल्या हॅरियर #DARK ने उत्तम कामगिरी केली आणि ग्राहकांच्या लोकप्रिय मागणीसह हॅरियर पोर्टफोलिओचा महत्त्वपूर्ण भाग बनली. या वेईकलने ग्राहकांना उत्साहवर्धक व अद्वितीय पॅकेज दिले, जे #DARK श्रेणीच्या सादरीकरणासह अधिक विस्तारित झाले. आम्हाला विश्वास आहे की, ही स्टायलिश #DARK एडिशन कार-खरेदीदारांना आलिशान सफारीमध्ये अपग्रेड करण्यासाठी आणखी एक कारण बनेल.
गेल्या वर्षी लॉन्च करण्यात आलेली टाटा मोटर्सची प्रमुख एसयूव्ही सफारीने मोठा मैलाचा दगड संपादित केला आहे. फक्त ६ महिन्यांमध्ये १० हजार रोलआऊट पूर्ण होण्यासोबत लॉन्चपासून १६ हजार आनंदी सफारी मालक या वेईकलचा आनंद घेत आहेत. #DARK सर्वांमध्ये लोकप्रिय असलेल्या त्यांच्या #Gold अवताराच्या सादरीकरणानंतर दिग्गज एसयूव्हीमधील आधुनिक भर आहे.
लॅण्ड रोव्हरच्या दिग्गज डी८ व्यासपीठामधून संचालित अत्यंत विश्वसनीय ओएमईजीएआरसी आर्किटेक्चरवर निर्माण करण्यात आलेल्या सफारीमध्ये आकर्षक डिझाइन व कार्यक्षमतेचे उत्तम संयोजन आहे. ही वेईकल आकर्षक व आरामदायी इंटीरिअर्स, अद्वितीय वैविध्यता, गो-एनीव्हेअर अनुभव, उच्चस्तरीय सुरक्षितता आणि आधुनिक बहुआयामी जीवनशैलीसाठी सर्वात अद्ययावत कनेक्टेड कार तंत्रज्ञान असण्याची इच्छा असलेल्या आजच्या एसयूव्ही ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करते.
अधिक माहितीसाठी कृपया जवळच्या टाटा मोटर्स शोरूमला भेट द्या किंवा cars.tatamotors.com या वेबसाइटवर क्लिक करा.




