टेक्नोकडून गेम-चेजिंग ३३ वॅट चार्जर, ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले असलेला नवीन ‘स्पार्क ८ प्रो’ लाँच
४ जानेवारी २०२२ पासून अॅमेझॉन स्पेशल्सवर उपलब्ध

नवी दिल्ली : टेक्नो या जागतिक प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने त्यांची लोकप्रिय ‘स्पार्क सिरीज’ पोर्टफोलिओअंतर्गत आणखी एक सर्वोत्तम स्मार्टफोन – नवीन स्पार्क ८ प्रो लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये विभागाला परिभाषित करणारी वैशिष्ट्ये आहेत- जसे ३३ वॅट सुपर-फास्ट चार्जर, ४८ मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरा, हेलिओ जी८५ प्रोसेसर, विशाल ६.८ इंच एफएचडी डॉट-इन-डिस्प्ले आणि प्रचंड क्षमतेची ५,००० एमएएच बॅटरी. स्पार्क ८ प्रो गतीशील जीवनशैली व मीडियाचा वापर करण्याची आवड असलेल्या भारताच्या जनरेशन झेड ग्राहकांना एकसंधी स्मार्टफोन अनुभव देत मनोरंजनाचा दर्जा उंचावण्यासाठी डिझाइन करण्यात आला आहे.
स्पार्क सिरीजमधील स्मार्टफोन्स किफायतशीर विभागामध्ये उच्च दर्जाचा कॅमेरा, डिस्प्ले आणि सर्वसमावेशक स्मार्टफोन अनुभवासाठी ओळखले जातात. या स्मार्टफोनमध्ये विभागाला परिभाषित करणारी वैशिष्ट्ये आहेत- जसे ४८ मेगापिक्सल ट्रिपल रिअर कॅमेरासह सुपर नाइट मोड, इंटेलिजण्ट फोकस आणि अंधुक प्रकाशात देखील प्रोफेशनल ग्रेड फोटोग्राफीसाठी मल्टी-फ्रेम एक्स्पोजर. तसेच स्पार्क ८ प्रो मध्ये विनाव्यत्य व्युइंग अनुभवासाठी ६.८ इंच एफएचडी+ डिस्प्ले, अविरत मनोरंजनासाठी ५००० एमएएच बॅटरी आणि ३३ वॅट सुपर-फास्ट चार्जर देखील आहे. हा चार्जर स्मार्टफोनला फक्त ६० मिनिटांमध्ये जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत चार्ज करतो. यासोबत कार्यक्षम व प्रबळ हेलिओ जी८५ ब्लेझिंग फास्ट प्रोसेसर आहे, ज्यामधून शक्तिशाली ग्राफिक्स व दर्जात्मक वापराचा अनुभव मिळतो.
या लाँचबाबत बोलताना ट्रांसियॉन इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरिजीत तालापात्रा म्हणाले, टेक्नोमध्ये आम्ही आमच्या नाविन्यपूर्ण उत्पादनामध्ये नेहमीच ग्राहक समाधानाला प्राधान्य देतो. स्पार्क सिरीजसह आमचे धोरण किफायतशीर दरांमध्ये उद्योगातील अग्रणी वैशिष्ट्यांसह सुसज्ज सर्वोत्तम स्मार्टफोन्सवर लक्ष देणे सुरू ठेवण्याबाबत आहे. नवीन स्पार्क ८ प्रो नेहमीच सर्वोत्तम बाबींची इच्छा असलेल्या भारतीय तरूणांच्या महत्त्वाकांक्षा लक्षात घेत डिझाइन करण्यात आला आहे. आणखी एक आनंददायी बातमी म्हणजे स्पार्क गो २०२१ चे अधिक स्टायलिश व्हर्जन स्पार्क गो २०२२ २९ डिसेंबर २०२१ पासून Amazon.inवर उपलब्ध असणार आहे. आम्ही आगामी वर्ष २०२२ मध्ये अशा प्रकारचे अनेक नवोन्मेष्कार सादर करण्यास आणि ग्राहकांना दर्जात्मक आधुनिक वैशिष्ट्ये देत राहण्यास उत्सुक आहोत.
टेक्नो स्पार्क ८ प्रो स्पार्क ७ प्रो व्हेरिएण्टला मिळालेल्या यशानंतर सादर करण्यात येत आहे. या स्मार्टफोनमध्ये विविध सुधारित वैशिष्ट्ये आहेत. स्पार्क ८ प्रो विन्सर व्हायोलेट, कोमोडो आयलँड, टर्कोइज सियान व इंटरसेलर ब्लॅक या चार आकर्षक रंगांमध्ये उपलब्ध असेल.
स्पार्क ८ प्रो ची ठळक वैशिष्ट्ये:
– अत्यंत जलद चार्जिंगसाठी ३३ वॅट सुपर-फास्ट चार्जर
– स्पार्क ८ प्रो सोबत शक्तिशाली ३३ वॅट टाइप-सी चार्जर येतो, जो १ तासामध्ये बॅटरीला जवळपास ८५ टक्क्यांपर्यंत चार्ज करू शकतो, ज्यामुळे बॅटरी संपण्याची चिंता करण्याची गरज भासणार नाही.
– ४८ मेगापिक्सल हा रिझॉल्युशन एआय कॅमेरासह सुपर नाइट मोड
– कॅमॉन ८ प्रो मध्ये ४८ मेगापिक्सल हाय रिझॉल्युशन एआय कॅमेरासह मोठे एफ१.७९ अर्पेचर व सुपर नाइट शॉटसह अल्ट्रा सेन्सिंग टेट्रासेल तंत्रज्ञान आहे, ज्यामधून कोणत्याही प्रकाशामध्ये सुस्पष्ट फोटोज कॅप्चर होण्याची खात्री मिळते. तसेच यामध्ये आकर्षक फोटोज कॅप्चर करण्यासाठी विविध प्रो शूटिंग मोड्स आहेत- जसे २के टाइम-लॅप्से, स्लो मोशन, व्हिडिओ बोकेह, व्हिडिओ ब्युटी इंटेलिजण्ट फोकस, जेण्डर स्पेसिफिक एआय ब्युटी.
– अधिक वापरासाठी हेलिओ जी८५ सुपरफास्ट प्रोसेसर
– स्पार्क ८ प्रो मध्ये गेमिंग अनुभवासाठी २ गिगाहर्टझ ऑक्टा-कोअर आर्म कोर्टेक्स ए७५ सीपीयू व १ गिगाहर्टझ माली जी५२ जीपीयू आहे. यामधील हायपरइंजिन तंत्रज्ञानासह इंटेलिजण्ट डायनॅमिक सीपीयू व जीपीयू मॅनेजमेंट एकसंधी कार्यक्षमता व बहुस्तरीय ऑप्टिमायझेशन देतात.
– ६८ इंच एफएचडी+ सेंटर डॉट-इन परफेक्ट डिस्प्ले
– स्पार्क ८ प्रो मध्ये विशाल ६.८ इंच एफएचडी+ सेंटर डॉट-इन परफेक्ट डिस्प्ले आहे. ज्यामुळे कन्टेन्ट पाहण्याचा व गेमिंगचा मनमुराद आनंद घेता येतो. ५०० नीट्स ब्राइटनेस प्रखर सूर्यप्रकाशात देखील स्क्रीन सुस्पष्टपणे दिसण्याची खात्री देते. स्क्रीनचा आकार गेम्स खेळण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा ई-लर्निंग, मीटिंग्ज इत्यादी सारख्या ऑनलाइन कृती करण्यासाठी अगदी परिपूर्ण आहे. यामधील १२० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट गेम्स खेळताना स्क्रीनवर अत्यंत जलद टच प्रतिसाद देते.
– अविरत कृतीसाठी ५००० एमएएच शक्तिशाली बॅटरी
– स्पार्क ८ प्रो मध्ये विशाल ५००० एमएएच बॅटरी आहे. यामुळे जवळपास ६३ दिवसांपर्यंत स्टॅण्डबाय टाइम व १६० तासांचे म्युझिक प्लेबॅक टाइम मिळते. शक्तिशाली बॅटरी विनाव्यत्यय स्मार्टफोन वापराचा अनुभव देते.
– मेमरी फ्युजन – जवळपास ७ जीबी रॅमपर्यंत विस्तारित व्हर्च्युअल मेमरी
– विस्तारित रॅम मनसोक्तपणे कन्टेन्ट पाहण्यासाठी या डिवाईसला परिपूर्ण बनवते. या स्मार्टफोनमध्ये ४ जीबी एलपीडीडीआर४एक्स रॅम व ६४ जीबी रॉम आहे. तसेच ३ जीबीपर्यंत वाढवता येणारी व्हर्च्युअल मेमरी आहे, जी रॅम क्षमता ७ जीबीपर्यंत वाढवते. ज्यामुळे रॅम मेमरी पुरेशी नसेल तर ओएस इंटरनॅल स्टोरेजमधील (रॉम) डेटा फिजिकल मेमरीमध्ये (रॅम) ट्रान्सफर करू शकते. इंटर्नल स्टोरेज समर्पित एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून जवळपास ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.




