Uncategorized

भारतात ओमिक्रॉन व्हेरियंटवर संशोधन सुरू; पंतप्रधान नरेंद्र मोदींची ‘मन की बात’

नवी दिल्ली : येत्या ४ दिवसांत हे वर्ष संपणार आहे. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वर्षाच्या अखेरच्या ‘मन की बात’मधून देशातील जनतेला संबोधित केले. ‘मन की बात’ चा आज ८४ वा कार्यक्रम होता. या मन की बातमधून पंतप्रधानांनी कोरोना, लसीकरण, ओमिक्रॉन आणि तामिळनाडूतील हेलिकॉप्टर अपघातावरही भाष्य केले.

देशाला संबोधित करताना आज सकाळी ११ वाजता ‘मन की बात’मधून मोदी म्हणाले की, सध्या देशात कोरोनाच्या नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटवर अभ्यास सुरू आहे. याला रोखण्यासाठी आपल्या सर्वांना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाच्या कठीण प्रसंगी आपण सर्व कुटुंबाप्रमाणे एकमेकांच्या पाठीशी उभे राहिलो. प्रत्येकाने आपापल्या परिसरात एखाद्याला मदत करण्यासाठी खूप प्रयत्न केले. सध्या देशात लसीकरणाचा १४० कोटी डोसचा टप्पा पार झाला आहे. ही भारतासाठी गौरवाची बाब आहे.

मोदींनी पुढे म्हटले की, ही जनशक्तीची ताकद आहे की, सर्वांच्या प्रयत्नांनी आपण मागील १०० वर्षात आलेल्या सर्वात मोठ्या महामारीचा सामना समर्थपणे केला. कोरोनाचा नवीन व्हेरिएंटचा आपले वैज्ञानिक अभ्यास करत आहेत. दररोज मिळत असलेल्या डेटाच्या आधारावर काम केले जात आहे. मात्र आपल्याला सजग आणि अनुशासित राहायचे आहे. नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटवर वैज्ञानिक अभ्यास करत आहे. दररोज नवीन डाटा त्यांना मिळत आहे. त्यांच्या सूचनांवर काम केले जात आहे.

मोदी पुढे म्हणाले की, यावर्षीही मी परीक्षेच्या आधी विद्यार्थ्यांशी चर्चेची योजना आखत आहे. या कार्यक्रमाची नोंदणी MyGov.in वर २८ डिसेंबरपासून सुरू होणार असून, २० जानेवारीपर्यंत चालणार आहे. यासाठी इयत्ता ९ वी ते १२ वी साठी विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांसाठी ऑनलाईन स्पर्धाही आयोजित करण्यात येणार आहे. तुम्ही सर्वांनी यात सहभागी व्हावे, असे ते म्हणाले.

पंतप्रधान पुढे म्हणाले, महाभारताच्या युद्धाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला ‘नभः स्पृशम् दीपतम’ म्हणजेच अभिमानाने आकाशाला स्पर्श करण्याचेस सांगितले होते. हे भारतीय हवाई दलाचे ब्रीदवाक्यही आहे. ग्रुप कॅप्टन वरुण सिंग यांचे जीवन असेच होते. या महिन्यात तामिळनाडूमध्ये अपघातग्रस्त हेलिकॉप्टर वरुण सिंह उडवत होता. त्या अपघातात आपण देशाचे पहिलेसीडीएस जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीसह अनेक वीरांना गमावले. वरुण सिंगनेही मरेपर्यंत अनेक दिवस शौर्याने लढा दिला पण नंतर तेही आपल्याला सोडून गेले.

या वर्षी ऑगस्टमध्ये त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले होते. जेव्हा वरुण रुग्णालयात होते, त्यावेळी त्यांनी आपल्या शाळेच्या मुख्याध्यापकांना लिहीलेले पत्र सोशल मीडिआवर व्हायरल झाले होते. हे पत्र वाचून माझ्या मनात पहिला विचार आला, तो म्हणजे यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतरही वरुण सिंह जमिनीशी जुडलेले होते. दुसरा विचार आला की, उत्सव साजरा करण्याची वेळ आली तेव्हा ते येणाऱ्या पिढ्यांची काळजी घेत होते. आपण ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचे जीवनही एक उत्सव व्हावे, अशी त्यांची इच्छा होती.

पंतप्रधान झाल्यापासून नरेंद्र मोदी यांनी रेडिओवर ‘मन की बात’ कार्यक्रमाची सुरुवात केली होती. ऑक्टोबर २०१४ मध्ये मोदींनी मन की बातची सुरुवात केली होती. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवार मन की बातद्वारे संवाद साधत असतात. आज ८४ वी ‘मन की बात’ आहे. या कार्यक्रमाचे पहिले प्रसारण ३ ऑक्टोबर २०१४ साली झाले होते. त्यानंतर प्रत्येक महिन्याला पंतप्रधान या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांसोबत अनेक मुद्द्यावर चर्चा करतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button